Advertisement

माझी आई विषयावर 10 ओळी | 10 lines on my mother in marath

माझी आई विषयावर 10 ओळी | 10 lines on my mother in marath

  1. माझी आई जगातील सर्वात चांगली आई आहे.

  2. माझी आई माझ्यासाठी सर्वात महत्वपूर्ण आहे.

  3. माझी आई मला खूप प्रेम करते.

  4. ती माझ्यासाठी स्वादिष्ट व्यंजन बनवते.

  5. मला रोज सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार करते.

  6. माझी आई मला अभ्यासात मदत करते.

  7. मी सुद्धा घराच्या कामात आईला मदत करतो.

  8. माझी आई मला चांगल्या गोष्टी शिकवते.

  9. माझी आई मला दररोज छान छान गोष्टी सांगते.

  10.  माझी आई मला प्रेमाने दादू म्हणते.


माझी आई निबंध मराठी | My Mother Essay in Marathi

जेव्हा मुलगा पहिल्यांदा बोलणे सुरू करतो तेव्हा त्याचा पहिला शब्द आई असतो. लहान मुलांसाठी आई ही सर्वकाही असते. आई शिवाय घर सुनेसुने वाटते. प्रत्येकाच्या जीवनात आईचे भरपूर महत्व असते, म्हणून मोठंमोठ्या लोकांनी आईच्या प्रेमाचा महिमा गायला आहे. जेव्हा आपण जन्माला येतो, मोठे होऊन चालायला लागतो, बोलणे सुरू करतो, शाळेत जायला लागतो या प्रत्येक ठिकाणी आई ही आपल्या सोबतच असते. आईला परमेश्वराचे दुसरे रूप मानले जाते. असे म्हणतात की देव प्रत्येकाजवळ राहू शकत नाही म्हणून त्याने आईला बनवले. आपल्या संस्कृतीती आईला देवी समान पूजनीय मानले जाते.  


आई ही एकच अशी व्यक्ती आहे जी स्वतःच्या दुःखांना विसरून मुलांच्या सुखासाठी प्रयत्न करते. स्वतःच्या जेवणाआधी ती मुलांना अन्न भरवते. आई ही मुलांना कधीही भुखे झोपू देत नाही, रात्री जर मुलाला झोप येत नसेल तर आई अंगाई गीत गाऊन झोपवते. आई मुलांना राजा राणी व पऱ्यांच्या सुंदर गोष्टी सांगते. आई आपल्या मुलांकडे पाहून नेहमी खुश होते. मुलांना जर थोडे पण दुःख झाले तर ती विचलित होते. आपले सर्व दुःख व चिंताना विसरून ती मुलांचे दुःख आधी दूर करते. अशी ही प्रत्येकाची आई असते. 


आई शब्द ऐकून आपले मन प्रफुल्लित होते. म्हणून ज्या पद्धतीने आई आपली चिंता व देखभाल करते त्याच पद्धतीने आई व वडिलांच्या म्हातारपणात आपण देखील त्याची देखभाल करायला हवी.

***


तर मित्रांनो हे होते माझी आई निबंध मराठी - Essay on my mother in marathi. या निबंधांचा आपण योग्य पद्धतीने सराव करावा अशी आमची इच्छा आहे. खास करून आपण सर्वांकरीता My Mother Essay in Marathi या लेखात उत्तम निबंधांचा समावेश करण्यात आलेला आहे. आशा आहे आपणास हे निबंध आवडले असतील. आपले विचार कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद...