OMTEX AD 2

Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

आत्मकथा मराठी निबंध

आत्मकथा / मनोगत निबंध

शेतकऱ्याची आत्मकथा निबंध पुस्तकाची आत्मकथा निबंध नदीची आत्मकथा निबंध झाडाची आत्मकथा सैनिकाचे आत्मवृत्त पृथ्वीचे मनोगत पोपटाचे मनोगत निबंध घड्याळची आत्मकथा सायकल चे आत्मवृत्त सूर्याची आत्मकथा पुरग्रस्तचे मनोगत वृत्तपत्राचे मनोगत फुलाची आत्मकथा मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा) रस्त्याचे आत्मकथन छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध

महत्वाचे निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

महत्वाचे निबंध

Important Marathi Essays

तंत्रज्ञान मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

ऋतूवरील मराठी निबंध

सणांवर मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

प्राण्यावर मराठी निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

माझा आवडता पक्षी मोर


माझा आवडता पक्षी वर निबंध (Majha Avadta Pakshi Mor)

जगभरात अनेक पक्षी व पक्षाच्या जाती आढळतात. काही पक्षी इतके सुंदर आणि मनमोहक असतात की त्याचे सौंदर्य पाहताच राहावे असे वाटते. मला देखील पक्षी पाहणे आवडते. माझा आवडता पक्षी मोर हा आहे. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोर हा दिसण्यात सुंदर आणि आकर्षक असतो. त्याला जास्त उंच उडता येत नाही म्हणून तो कायम जमिनीवरच राहतो. 


मोर पक्षी इतर पक्षांच्या तुलनेत मोठा असतो. त्याच्या शरीरावर आकर्षक पंख असतात. या पंखांना मोरपीस म्हटले जाते. मोर त्याच्या सुंदर पंखांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. पावसाळ्याच्या दिवसात मोर आपला पिसारा फुलवून नृत्य करतो. मोराचे हे नृत्य मनाला मोहून घेते त्याचे नृत्य पाहणारा पाहतच राहून जातो. मोराचे वजन 5 किलोपर्यंत असते. त्याचे संपूर्ण शरीर निळ्या रंगाचे असते. 


संपूर्ण भारतात मोर आढळतात. ते जास्तकरून नदी तसेच इतर पाण्याच्या जलस्त्रोतांजवळ राहतात. मोर खूप कमी उडतात, जेव्हा त्याच्या जीवाला धोका असेल तेव्हाच एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर किंवा एका किनाऱ्यावरून दुसर्‍या किनार्‍यावर उडून जातात. मोर हे अन्न म्हणून धान्याचे दाणे, झाडाची पाने, फळे, किडे, साप, पाल या गोष्टी आवडीने खातात. 


ग्रामीण भागात बऱ्याचदा मोर शेतातील पिकाचे नुकसान करून जातात. म्हणून शेतकरी त्यांना पळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करीत असतात. मोर आपले घर जमिनीवरच बनवतात, घर बनवण्यासाठी ते जमिनीवर असलेल्या झाडांच्या फांद्या व लाकडी दांड्या वापरतात. एका वेळेला ते 3 ते 5 अंडे देतात. 


मोर खूपच आकर्षक असतो व प्रत्येक व्यक्तीला मोर पाहायला आवडतो. मोर फक्त भारताचाच नव्हे तर म्यानमार चा देखील राष्ट्रीय पक्षी आहे. आणि माझ्या आवडता पक्षी पण मोर आहे.

खेळावरील मराठी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

निबंधलेखन Marathi

माझी आई निबंध मराठी [150 Words] 

माझी आई निबंध मराठी [500 words]

माझी आई विषयावर 10 ओळी 

माझे वडील निबंध मराठी 

माझे बाबा मराठी निबंध 

माझी शाळा 10 ओळी निबंध 

माझी शाळा निबंध मराठी [200 words]

माझी शाळा निबंध मराठी [300 words]

माझी शाळा निबंध मराठी [400 words]

माझी सहल [आमची सहल] मराठी निबंध [300 words]

माझी सहल निबंध [400 words]

माझी आजी निबंध मराठी

माझे आजोबा निबंध मराठी

माझे गाव मराठी निबंध

माझे गाव मराठी निबंध [300 words]

माझे शेजारी [आमचे शेजारी] मराठी निबंध 

आदर्श नागरिक [खरा नागरिक] मराठी निबंध | Adarsh nagrik marathi nibandh

आदर्श नागरिक मराठी निबंध | Adarsh nagrik marathi nibandh

कोणत्याही देशाचे नागरिक हेच त्या देशाची संपत्ती असतात. जर देशाचे नागरिक आदर्श, मेहनती आणि सज्जन असतील तरच देश प्रगती करतो. एक आदर्श नागरिक सर्वात आधी एक आदर्श व्यक्ती असतो. तो नेहमी देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असतो. असा व्यक्ती आपल्या देशाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. आपल्या भारत देशात अनेक प्रसिद्ध असे आदर्श नागरिक होऊन गेले आहेत. 


जसे महात्मा गांधी, भगत सिंह, लोकमान्य टिळक, डॉ एपीजे अब्दुल कलाम इत्यादी. या महापुरुषांनी इमानदारी च्या मार्गावर चालत देशाच्या प्रगतीत सहकार्य केले. सोबतच भारतच नव्हे तर जगभरातील लोकांसमोर आदर्श निर्माण केला. 


आदर्श नागरिकाचे अनेक गुण असतात. एक आदर्श नागरिक इमानदार, कर्तव्यनिष्ठ आणि सत्य मार्गावर चालणारा असतो. तो आपल्या देशाची संस्कृती, इतिहास आणि भुमिशी प्रेम करतो. आदर्श नागरिकाच्या मनात देशप्रेम भरलेले असते. तो देशाविषयी आपल्या कर्तव्यांना पुरेपूर बजावतो आणि नेहमी आपल्या कर्तत्व्या प्रति जागरूक असतो. असा नागरिक वेळप्रसंगी देशासाठी आपले प्राण देण्यासही तयार असतो. 


एक चांगला नागरिक स्वच्छेने नियमांचे पालन करतो. तो राष्ट्राच्या उन्नतीसाठी सकारात्मक योगदान देतो. आदर्श नागरिक राष्ट्र उत्थानाच्या कार्यक्रमात उत्साहाने सामील होतो. तो समाजाच्या आदर्श मूल्यांना सन्मान देतो आणि समाजात असलेल्या कुरिती समाप्त करण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करतो. 


आदर्श नागरिकाचे संपूर्ण जीवन समाजासाठी आणि देशासाठी अर्पित असते. परंतु दुसरी कडे काही असेही नागरिक असतात जे स्वताच्या स्वार्थासाठी देश आणि समाजाचा बळी देण्यासाठी देखील मागे पुढे पाहत नाही. आज आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत जे धोकेबाजी करून देशाला नुकसान पोहचवतात. हे लोक आपल्या देशासाठी हानिकारक असतात. 


एक आदर्श नागरिक हाच देशाची शान असतो. तो सर्वांशी प्रेम करतो आणि समाजात असलेले वाईट लोकांचे सत्य सर्वांसमोर आणतो. म्हणून आपण सर्वांचे कर्तव्य आहे की आपण देशाचे आदर्श नागरिक बनायला हवे आणि देशाविषयी आपली जवाबदारी समजून देश सेवेचे कार्य करायला हवे. आपली संस्कृती आणि इतिहास कायम ठेवण्यासाठी एकमेकांशी प्रेम आणि बंधुकिने राहायला हवे. स्वच्छता, अहिंसा, प्रेम, भाऊ बंधुकी, राष्ट्रप्रेम आणि दयाळू हृदय हे एका आदर्श नागरिकाचे प्रमुख गुण आहेत. आणि जेव्हा देशातील नागरिक या गुणांना आत्मसात करतील तेव्हा देशाला महासत्ता बनण्याहुन कोणीही रोखू शकत नाही.

समाप्त


आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh vidyarthi nibandh in marathi

आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh vidyarthi nibandh in marathi

एक आदर्श विद्यार्थी जन्मापासून आदर्श राहत नाही. तो चांगले शिक्षण मिळवून व चांगल्या लोकांसोबत राहून आदर्श बनतो. वर्गातील एक आदर्श विद्यार्थी तो असतो ज्याला पाहून शिक्षक व इतर विद्यार्थी प्रभावित होतात. प्रत्येक शिक्षकाचे स्वप्न असते की त्याचा वर्ग आदर्श विद्यार्थ्यांनी भरलेला असावा. असे म्हणतात की जर एखादे कार्य आपण पुन्हा पुन्हा करत असू तर शरीराला त्याची सवय होऊन जाते. आदर्श विद्यार्थ्याचे काही गुण पुढील प्रमाणे आहेत, ज्यांना आचरणात आणून सामान्य विद्यार्थीही आदर्श बनू शकतो.


एका आदर्श विद्यार्थ्यांमधील सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे तो मेहनती असतो. तो आपल्या आयुष्यात एक स्वप्न निर्धारित करून ठेवतो. व त्या दिशेने आपली वाटचाल सुरू ठेवतो. आदर्श विद्यार्थी आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात आपले संपूर्ण बळ लाऊन प्रयत्न करतो. तो खेळ, अभ्यास व इतर सर्व गोष्टी उत्तमोत्तम करण्याचा प्रयत्न करतो. व कधीही प्रयत्न करण्यात संकोच करीत नाही.


आदर्श विद्यार्थ्यांतील दुसरा गुण त्याचा उर्जावानपणा असतो. एक आदर्श विद्यार्थी नेहमी ऊर्जेने भरलेला असतो, तो कधीही आळस करत नाही. तो दररोज सकाळी लवकर उठतो त्याची दिनचर्या ठरलेली असते. तो दररोज योग व व्यायाम करतो. कधीही फास्ट फूड न खाता तो नेहमी आरोग्यदायी भाजीपाला खातो. ज्यामुळे त्याच्या शरीरात ऊर्जा राहते व त्यांचे चित्त अभ्यासात लागते. 


जिज्ञासा हे देखील आदर्श विद्यार्थ्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. एका आदर्श विद्यार्थ्याला नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी जिज्ञासा लागलेली असते. तो शिक्षकांना नेहमी वेगवेगळे प्रश्न विचारीत असतो. वेगवेगळी पुस्तके व माहिती वाचून तो ज्ञान ग्रहण करतो. 


सकारात्मकता हा आदर्श विद्यार्थ्याचा महत्त्वाचं गुण आहे. तो आयुष्य आणि आयुष्यातील समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. विद्यार्थी तसेच प्रत्येक वयातील व्यक्तीसाठी सकारात्मकता अती महत्त्वाची आहे. कारण सकारात्मक दृष्टीकोण सर्वच समस्या सोडवण्यात सहाय्यक आहे. आपल्याला जर आदर्श विद्यार्थी बनायचे असेल तर नेहमी सकारात्मक विचार ठेवून प्रत्येक समस्येला हसून स्वीकारायला हवे. 


याशिवाय आदर्श विद्यार्थ्याचा आणखी एक महत्त्वाचं गुण म्हणजे तो नेहमी खरे बोलतो व मोठ्यांच्या आज्ञेचे पालन करतो. जो विद्यार्थी खोटे बोलतो त्याला एक खोटे लपण्यासाठी अनेक खोटे बोलावे लागतात. ज्यामुळे त्याला नेहमी खोटे बोलण्याची सवय लागते. आणि नेहमी खोटे बोलणारा व्यक्ती कधीही अशस्वी होत नाही. या शिवाय आदर्श विद्यार्थ्याला आज्ञाकारी राहायला हवे. नेहमी मोठ्यांच्या आज्ञाचे पालन करायला हवे. कारण मोठे लोक नेहमी आपल्या चांगल्यासाठी सल्ला देतात म्हणून त्यांचे ऐकणारे विद्यार्थी नेहमी यश प्राप्त करतात. 


एका आदर्श विद्यार्थी घडवण्यात आई वडील, शिक्षक आणि समाजाचे योगदान महत्त्वाचे आहे. लहानपणापासून मुलांना योग्य शिक्षण देऊन त्यांना आदर्श बनवले जाऊ शकते. एक आदर्श विद्यार्थी आयुष्यातील सर्व समस्या पार करीत देशाचे व आपल्या समाजाचे नाव मोठे करतो. म्हणून आज आवश्यकता आहे की शाळा तसेच पालक मंडळीनी आपल्या मुलानं कडे योग्य लक्ष देऊन त्यांना आदेश गुणांनी शिक्षित करायला हवे.

--समाप्त--


श्रमाचे किंवा कष्टाचे महत्व मराठी निबंध | shramache mahatva essay in marathi

परिश्रमाचे महत्व मराठी निबंध 

भगवान श्री कृष्ण गीते मध्ये म्हणतात की “कर्मण्येवाधिकारस्तू या फलेषु कदाचन:|” या श्लोकाचा अर्थ होतो की परिश्रम अर्थात कार्य किंवा कर्म हीच माणसाची पूजा अर्चना आहे. या पुजेशिवाय मनुष्याचे सुखी आणि समृद्ध होणे कठीण आहे. जो व्यक्ती श्रमापासून दूर राहतो तो आळशी आणि नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहणारा असतो. पूर्वीपासूनच कठीण परिश्रमाचे महत्व सांगितले गेले आहे. कोणतेही कार्य श्रमाशिवाय शक्य नाही. श्रमाच्या शक्तीने जगात काहीही मिळवले जाऊ शकते. 


परिश्रमी व्यक्ती आपल्या कर्मंद्वारे सर्व इच्छांची पूर्ती करतात. असे लोक संकटांना न घाबरता धैर्याने सामोरे जातात. जगात प्रत्येकाला परिश्रम करणे आवश्यक आहे. परिश्रमाने शेतकरी शेतात पीक उगवतो व कोरड्या जमिनीला सोन्याचे रूप देतो. शेतकरी दिवस रात्र मेहनत करून आपल्या शेताला सोन्यासारखे बनवतो. श्रम एक असे साधन आहे ज्याच्या मदतीने व्यक्ती जीवनातील सर्वच समस्यांपासून सुटका मिळवू शकतो. नियमित केलेले परिश्रम आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहचवते.


आज जगातील सर्वच देश कठीण श्रमाने विकास करीत आहेत. मेहनती व्यक्तीला फक्त जिवंतपणी नाही तर मेल्यानंतरही यश प्राप्त होते. ज्या देशाचे लोक मेहनती असतात तोच देश प्रगती करू शकतो. ज्या देशाचे नागरिक आळशी आणि भाग्यावर अवलंबून असतात तो देश गुलाम बनतो. 


ज्या पद्धतीने सूर्य त्याच्या प्रकाशने रात्रीचा अंधकार दूर करतो. त्याच पद्धतीने श्रमाने मनुष्याच्या जीवनातील अज्ञान रुपी अंधकार दूर होऊन व्यक्तीचे भविष्य उज्वल बनते. कठीण परिश्रमा शिवाय उन्नती संभव नाही. कारण जरी समोर स्वादिष्ट व्यंजनांचे ताट सजलेले आहे तरी जर त्याला खाण्यासाठी थोडेही कार्य केले गेले नाही तर भोजन कितीही स्वादिष्ट राहिले तरी त्याचा स्वाद घेता येत नाही. .


मानव परिश्रमाचेच फळ आहे की आज दुर्गम भागात प्रवासाचे योग्य साधन उपलब्ध झाले आहेत. पर्वतांना कापून रस्त्यांचा निर्माण केला गेला आहे. नदी आणि समुद्रवरही पुल बनवण्यात आले आहेत. जगभरात मोठमोठ्या इमारती निर्माण करणे, अंतरीक्ष मध्ये जाणे इत्यादी सर्व गोष्टी परिश्रमाने साध्य झाल्या आहेत. म्हणून मानवी जीवनात परिश्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जो व्यक्ती नेहमी कार्यरत असतो यश त्याच्या चरणात असते.


ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध | Granth hech guru Essay in Marathi

ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध | Granth hech guru nibandh Marathi

भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान पूजनीय आहे. कोणत्याही व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. आपल्या संस्कृतीत गुरुची महती 'गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा' अश्या पद्धतीने गायली आहे. गुरु प्रमाणेच ग्रंथ हा एक असा खजिना आहे, ज्याचा जितका उपयोग आपण करू तितकेच समृद्ध होत जाऊ. ग्रंथ अज्ञानाचा अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करतात. ग्रंथातून असीम ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपविले जाते. आज विज्ञानाने जी प्रगती केली आहे तिचे रहस्य याच ग्रंथामध्ये दडलेले आहे. ग्रंथ आपल्याला खूप काही शिकवतात. ग्रंथांच्या मदतीने आपल्याला आपली संस्कृती व धर्मा बद्दलची माहिती मिळते. ग्रंथात लिहिलेल्या गोष्टी आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची शिक्षा देतात. 


बालवयात सांगितल्या गेलेल्या गोष्टी मुलांच्या बालमनावर खूप परिणाम करतात. आजी आजोबा कडून ऐकण्यात आलेल्या गोष्टी मुलांना खूप प्रभावित करतात. या सर्व गोष्टी ग्रंथामध्ये लिहिलेल्या असतात. ग्रंथ एकाकीपणात आपल्याला धीर देतात. म्हणून अनेक महान लोकांनी ग्रंथाचे महत्व सांगितले आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात आपला प्रसिद्ध ग्रंथ गीतारहस्य लिहिला. महात्मा गांधींनी माझे सत्याचे प्रयोग हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. महान लोकांद्वारे लिहिलेले हे सर्व ग्रंथ अथांग ज्ञानाचा सागर आहेत. 


ग्रंथ आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. प्राचीन भारतीय ग्रंथ जसे वेद, गीता, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादी अनेक ग्रंथ जीवन जगण्याची पद्धत शिकवतात. भारतीय वेद हे जगातील प्रथम धर्मग्रंथ आहेत. याच वेदांपासून इतर धर्मांची उत्पत्ती झाली आहे. वेद परमेश्वराद्वारे ऋषी मुनींना सांगण्यात आले होते. वेद प्राचीन ज्ञानाचा अथांग सागर आहेत. प्राचीन ग्रंथा‍पैकी एक श्रीमद् भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारत युद्धाच्या वेळी सांगितली होती. गीते मध्ये 18 अध्याय आहेत. गीते मध्ये एकेश्वरवाद, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग इत्यादींची सुंदर पद्धतीने चर्चा केली आहे.


मी अनेक ग्रंथ वाचले आहेत व अजुनही वाचत आहे. मला वाचायला खूप आवडते वाचन हा माझा छंदच आहे. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ ज्ञानेश्वरी अनेक भाषांमध्ये प्रकाशित आहे. या ग्रंथाला त्यांनी 1290 साली लिहिले होते. हा ग्रंथ भगवत गीतेचा मराठी अनुवाद होता. या ग्रंथाद्वारे ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील ज्ञान सर्वांना समजेल अशा पद्धतीने प्राकृत भाषेत समजावून दिले. 


आज प्रत्येकाने ग्रथ वाचनाची सवय लावून घ्यायला हवी. प्रत्येक गावात एक तरी ग्रंथालय बनवायला हवे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना पुस्तके वाचायला मिळतील कारण ग्रंथ हे केवळ गुरु नसून आपले चांगले मित्र देखील असतात.

--समाप्त--


[निबंध] वेळेचे महत्व मराठी निबंध | Veleche mahatva essay in Marathi

वेळेचे महत्व मराठी निबंध (320 words)

आयुष्यात यशस्वी झालेल्या लोकांच्या यशाचे रहस्य एकच असते आणि ते म्हणजे 'वेळेचा सदुपयोग'. यशस्वी लोक वेळेचे मूल्य समजून त्याचा योग्य उपयोग करतात. जगात सर्वच गोष्टींपेक्षा वेळेला अधिक शक्तीशाली मानले गेले आहे. जर एकदा मौल्यवान वेळ गेला तर तो कधीही परत येत नाही. वेळेचे हे चक्र पुढील बाजूलाच सुरू असते. हे सत्य आहे की जर एखादा व्यक्ती वेळेचे महत्त्व समजत नाही तर वेळ देखील त्याला महत्त्व देत नाही. जर आपण आपला वेळ नष्ट करत असू तर लवकरच वेळ आपल्याला नष्ट करून टाकेल. वेळ कधीही कोणाची वाट पाहत नाही व कोणासाठी थांबतही नाही. प्रत्येकाला वेळेसोबत चालावेच लागते. 


महान संत स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते की “एका वेळी एकच काम करा, व ते काम करतांना इतर सर्व विसरून आपले पूर्ण चित्त त्यात लाऊन द्या.” ही खूपच आश्चर्याची गोष्ट आहे की एक अशी वस्तू जीचा न अंत आहे न सुरुवात, ही खूपच शक्तिशाली वस्तू आहे, जिच्या सोबत सर्वच मानव जन्म घेतात व आपले जीवन जगून नष्ट होतात. यावेळेला सीमा नसते, तो निरंतर चालत असतो. जवळपास प्रत्येकालाच वेळेचे महत्त्व माहीत असते परंतु तरीही वाईट परिस्थितीत काही लोक धैर्य हरवून आपला वेळ नष्ट करणे सुरू करतात. 


असेही म्हटले जाते की वेळ हाच धन आहे. पण जर आपले धन खर्च झाले तर ते परत मिळवले जाऊ शकते. परंतु एकदा वाया गेलेली वेळ परत मिळत नाही. म्हणूनच वेळ हा धन आणि सृष्टीतील सर्वच गोष्टींपेक्षा मौल्यवान आहे. नेहमी बदलत असलेला वेळ निसर्गाचा नियमच आहे. या निसर्गात सर्वच गोष्टी वेळेनुसार चालतात. बरेच विचार करतात की जीवन खूप मोठे आहे, परंतु सत्य तर हे आहे की हे आयुष्य खूपच लहान आहे व आयुष्यात करण्यासाठी खूपच गोष्टी आहेत. म्हणूनच वेळ वाया न दवडता आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायला हवा. 


आपले सर्व दैनंदिन कार्य जसे सकाळी उठणे, शाळेची तयारी, घराची कामे, झोपण्याचा वेळ, व्यायाम, जेवण इत्यादी गोष्टी वेळेनुसार करायला हव्यात. आपण कठीण परिश्रम करण्याचा आनंद मिळवायला हवा व कधीही चांगल्या कामांना टाळायला नको. वेळेचे महत्त्व समजून त्यानुसार आपली सर्व कार्य करायला हवीत. 

***


2) veleche mahatva short essay in marathi (220 words)

वेळ, वेळेचे चक्र असे असतो जे कधीही एका जागी स्थिर राहत नाही. वेळ सदैव गतिशिल असतो. वेळेची किंमत असणे बुद्धिमान व्यक्तीची ओळख आहे. ज्याला वेळेची किंमत असते. तो वेळेला ओळखून त्यानुसार कार्य करतो आणि यश त्याच्या चरणात असते. याशिवाय ज्याला वेळेची पारख नसते अर्थात जो व्यक्ती वेळेचे महत्त्व समजत नाही. त्याला आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते व अश्या व्यक्तीला अनेक वेळा पश्चाताप करावा लागतो. 


निसर्गातील सर्व कार्य वेळेनुसार होतात जसे सूर्य उगणे, दिवसाची रात्र होणे, ऋतू बदलने इत्यादी. जर ही सर्व कार्य वेळेवर झाली नाही तर आपल्या निसर्गाचे संतुलन बिघडून अनेक संकटे निर्माण होतील. वेळेचा सदुपयोग वेळेच्या वास्तविक ओळखीनेच संभव आहे. म्हणून आपण सर्वांनी वेळेचे महत्त्व समजून त्याचा योग्य उपयोग करायला हवा. विद्यार्थी जीवनात तर वेळेचे महत्व अधिकच आहे. ज्या व्यक्तीने विद्यार्थी जीवनात वेळेचे महत्व जाणले तो आयुष्यात खूप प्रगती करतो. वेळेचे महत्व न ओळखल्याने बरेच विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण होऊन जातात. 


वेळेचे महत्त्व समजावीत संत कबीर यांनी पुढील ओळी म्हटल्या

काल करे सो आज कर, आज करे सो अब। 

पल में प्रलय होएगी बहुरि करेगा कब।।

संत कबीरांच्या या ओळींचा अर्थ आहे की आपल्याला कोणत्याही कामांना उद्यावर टाळायला नको. उद्यावर टाळल्या जाणार या कामांना आजच करून टाकायला हवे. कबीरदासांचे मत होते की जर पुढील क्षणातच प्रलय आला तर आपले काम राहूनच जाईल. 


म्हणून शेवटी वेळेची किंमत समजून आपण त्याला महत्त्व द्यायला हवे. आपल्या आयुष्यातील वेळेवर आपण लक्ष केंद्रित करून एक क्षणही वाया घालवायला नको.

***


मराठी भाषेचे महत्व मराठी निबंध | Marathi bhasheche mahatva

मराठी भाषेचे महत्व निबंध | Marathi Bhasheche Mahatva

(400 शब्द)

महाराष्ट्र अधिनियम 1964 नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठीला घोषित केले आहे. 27 फेब्रुवारी या दिवसाला मराठी राजभाषा दिन म्हणून साजरे केले जाते. या दिवशी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ज्येष्ठ कवी श्री विष्णु वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म झाला होता. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना स्मरण म्हणून मराठी राजभाषा दिवस 27 फेब्रुवारी म्हणजेच त्यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो.


मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे. ही मुख्यतः महाराष्ट्र व गोवा च्या काही भागात बोलली जाते. जगभरात बोलल्या जाणाऱ्या लोकांच्या संखेनुसार मराठी ही 10 व्या क्रमांकाची भाषा आहे. व भारतात बोलल्या जाणाऱ्या एकूण भाषापैकी मराठी तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे.  मराठी ही जगातील प्राचीन भाषापैकी एक आहे. मराठी भाषेचा इतिहास प्राचीन आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13 व्या शतकात आपल्या साहित्यातून मराठी भाषेचा महिमा गायला होता. महाराष्ट्राला मराठी भाषिकांचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. व आजवर अनेक महान लेखकांनी आपल्या लिखानाने मराठी भाषेच्या साहित्यात भर केली आहे.  एक न अनेक साहित्यकृतीमुळे मराठी भाषा जगभरात पोहचली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषिकांची एकूण संख्या 9 कोटी आहे. 


मराठी भाषेचे महत्व हे शब्दात वर्णन करणे फार कठीण आहे. मराठी भाषेत अनेक महान लेखकांनी साहित्य लिहिले आहे. परंतु मराठी भाषेचे उत्कृष्ट कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी  व योग्य महत्व प्राप्त करवून देण्यासाठी अथक परिश्रम केले. त्याच्या स्मृतींना स्मरण म्हणून दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मराठी राजभाषा दिवस 27 फेब्रवारी ला साजरा केला जातो. कुसुमाग्रजां शिवाय अनेक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांनी मराठी भाषेच्या विकासासाठी कार्य केले. काही प्रसिद्ध मराठी लेखकांची नावे पुढील प्रमाणे आहेत. कृष्णाजी केशव दामले, गोविंद विनायक करंदीकर, त्र्यंबक बापुजी ठोंबरे, प्रल्हाद केशव अत्रे, राम गणेश गडकरी, विष्णु वामन शिरवाडकर, निवृत्ती रामजी पाटील, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आत्माराम रावजी देशपांडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, विनायक जनार्दन करंदीकर इत्यादी.


आज मराठी भाषा ज्या रूपात जिवंत आहे, त्या रूपात तिला जिवंत ठेवण्यामागे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान आहे. शिवरायांमुळे महाराष्ट्र व मराठी भाषा टिकून आहे. मध्ययुगात अनेक विदेशी आक्रमकांनी भारतावर आक्रमण केले, शिवरायांनी मोठ्या शौर्याने यांच्याशी लढत महाराष्ट्र व मराठी भाषेचे रक्षण केले. मराठी ही आपल्यासाठी केवळ एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे आणि संस्काराचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरासाठी हळुवार आणि प्रेमळ असतात व वेळप्रसंगी जी आई मुलाच्या चांगल्यासाठी कठोर शब्दही बोलते तशीच आपली मराठी आहे. तिच्या शब्दाची शक्ती प्रचंड आहे. जागतिकीकरणाच्या या स्पर्धेत आपण आपली मराठी भाषा विसरू नये अशी माझी इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या माय मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे रक्षण केले होते.

***


मराठी भाषा निबंध- marathi bhasheche mahatva

(200 शब्द)

महाराष्ट्र राज्याची भाषा म्हणजे मराठी. मराठी संपूर्ण भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषा पैकी तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य आहे. महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषेचा महिमा सांगितला आहे. दरवर्षी 27 फेब्रुवारीला कवी कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मृतींना स्मरून मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. मराठी ही 1500 वर्षांचा इतिहास जपणारी भाषा आहे.


महाराष्ट्रातील घरा घरामध्ये मराठी माय बोली भाषा बोलली जाते. आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात जेवढे लेखक साहित्यकार लाभले आहेत त्यांनी मराठी भाषेचे महत्व जपून ठेवले आहे. या भाषेमुळेच आपण आपले सुरुवाती लेखन-वाचन शिकलो. मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे. परंतु आज दिवसेंदिवस वाढत्या इंग्रजी भाषेच्या आकर्षणामुळे मराठी भाषा जपणे काळाची गरज झालेली आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण बरेचसे इंग्रजीचे शब्द वापर करत असतो. सगळीकडे इंग्रजी भाषेचा प्रसार झालेला आहे. महाराष्ट्रातील अनेक कंपनी मध्ये कामाच्या ठिकाणी इंग्रजी भाषेतूनच व्यवहार केले जातात. शाळेत दाखल करताना देखील पालक आपल्या पाल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकावे अशी इच्छा दर्शवतात. 


मराठी भाषा टिकली तरच महाराष्ट्रीयन समाज टिकेल. आपल्या विचारांची, संस्कृतीची देवाणघेवाण ही मातृभाषेतूनच होऊ शकते. आपल्या बर्थडेला वाहू आपल्या मातृभाषेतूनच मिळेल. आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला आपल्या मातृभाषेशी निगडीत असणे फार महत्त्वाचे आहे. आपली मराठी भाषा आपण समृद्ध केली पाहिजे व विविध मराठी पुस्तकांचे वाचन करून मातृभाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.

***