Skip to main content

[निबंध] बालमजुरी / बालकामगार मराठी निबंध- Child labour essay in Marathi

बालकामगार मराठी निबंध- balkamgar or balmajuri nibandh marathi 

आपल्या देशात देवाच्या बाल रुपाची अनेक मंदिरे आहेत. जसे बाल गणेश, हनुमान, श्रीकृष्ण इत्यादी. आपल्या देशात मुलांना देवा घरची फुले म्हटले जाते. ध्रुवबाळ, भक्त प्रल्हाद, लव कुश, अभिमन्यू या सारखे अनेक बालक भारतीय संस्कृतीत होऊन गेलेत. परंतु आजच्या काळात भारतात गरिबी ची स्थिती मोठ्या प्रमाणात आहे. देशातील गरीब मुलांची स्थिती चांगली नाही. बालश्रम व बालकामगार आपल्या देशाची मोठी समस्या आहे. बाल मजुरी मुळे गरीब मुलांचे भविष्य अंधकामय होत आहे. 


14 ते 18 वर्षाच्या लहान मुलांद्वारे काम करून घेणे म्हणजेच 'बाल मजुरी' होय. कमी वयात काम करणाऱ्या या मुलांना बालकामगार म्हटले जाते. कोणत्याही राष्ट्राच्या विकासासाठी तरुण व लहान मुलांची शक्ती खूप उपयुक्त असते. परंतु आपल्या देशातील काही लोक थोड्या पैशांच्या हव्यासापोटी आपल्या मुलांना बालमजुरी च्या कामाला लाऊन देतात. कमी पैशात कामगार मिळाल्याने हॉटेल, कारखाने व दुकानीचे मालकही या मुलांना कामावर ठेवून घेतात. 


आज आपल्या देशातील गरीब मुले हॉटेल, कारखाने, दुकानी, धार्मिक स्थळ व  इतर ठिकाणी कामे करतांना दिसतात. काही मुले तर मोठ मोठ्या कारखान्यामध्ये धोकादायक कामगिरी करतानाही दिसून जातात. भारतीय राज्यघटनेच्या 1950 च्या कलम 24 नुसार 14 वर्षाखालील कोणत्याही बालकाला कारखान्यात काम दिले जाणार नाही. व जर कोण्या कारखान्यात या कायद्याचे उल्लंघन होताना आढळले तर भारतीय विधिमंडळाने फॅक्टरी ॲक्ट 1948 आणि चिल्ड्रेन अॅक्ट 1969 मध्ये तरतुदी करून फॅक्टरी मालकावर दंड व कारावासाची शिक्षा सुनावली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 45 नुसार प्रत्येक राज्य शासनाचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या निशुल्क शिक्षणाची व्यवस्था करावी. 


बालकामगार व बाल मजुरी ही समस्या फक्त भारतात नसून जगातील अनेक विकसनशील देशात मोठ्या प्रमाणात आहे. गरिबी रेषेखालील आई वडील आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करू शकत नाहीत. या शिवाय जीवन जगण्यासाठी पैश्यांची देखील आवश्यक असते. म्हणूनच आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची गरीब आईवडील कामावर पाठवतात. 


मागील काही वर्षात शासनाच्या प्रयत्नामुळे देशातील बालकामगारांची संख्या बरीच कमी झाली आहे. भारत शासनाचे हे काम प्रशंसनीय आहे. आपल्या देशात आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत करण्यात आले आहे. या शिवाय शाळेतच मुलांना मध्यान भोजनाची व्यवस्था करण्यात येते. परंतु अजूनही देशात बालकामगारांची समस्या आहे. या गंभीर समस्या वर लवकरात लवकर उपाययोजना करायला हवी. व भारत शासनाच्या या कार्यात सहयोग करणे देशातील नागरिकांचे देखील कर्तव्य आहे.

--समाप्त--


Comments