Advertisement

गौतम बुद्ध मराठी निबंध | Gautam buddha essay in marathi

गौतम बुद्ध निबंध मराठी | Gautam buddha marathi nibandh (350 शब्द )

महात्मा बुद्ध यांना शांती व अहिंसेचे दैवत मानले जाते. ज्या काळात संपूर्ण भारतात हिंसा, अशांती, अंधविश्वास आणि अधर्म वाढला होता तेव्हा भगवान बुद्धांनी अवतरीत होऊन सर्व लोकांना बंधनातून मुक्त केले. महात्मा बुद्ध एक युग प्रवर्तक होते ज्यांनी न केवळ भारतात परंतु संपूर्ण विश्वात आपल्या ज्ञानाने ज्योत पेटवली. त्यांना 'लाईट ऑफ आशिया' म्हणूनही संबोधले जाते.


भगवान बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 569 मध्ये लुंबिनी नावाच्या एका स्थानावर झाला. ते कपिलवस्तू चे राजा शुद्धोधन यांचे पुत्र होते व त्यांचे जन्म नाव सिद्धार्थ होते. जन्माच्या वेळीच ज्योतिषांनी सिद्धार्थ मोठे झाल्यावर महान संत किंवा एक महान सम्राट बनणार अशी भविष्यवाणी केली होती. राजकुमार असल्याने लहानपणापासून त्यांना राजसी सुखसुविधा उपलब्ध झाल्या होत्या. परंतु सिद्धार्थ विरक्त स्वभावाचे होते. शुद्धोधन राजांनी त्यांचा विवाह यशोधरा नावाच्या एका सुंदर राजकुमारी शी करून दिला. नंतर च्या काळात त्यांना राहुल नावाचा एक मुलगा झाला.


सिद्धार्थ यांचे मन आजूबाजूच्या गोष्टी पाहून फार प्रभावित होत असे. एकदा महालातून बाहेर पडल्यावर त्यांनी एक म्हातारा, एक आजारी व्यक्ती व एक मृत प्रेत पाहिले. हे सर्व दुःख पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की जीवनातील सुखं भौतिक वस्तूंच्या उपभोगणे मिळवता येत नाही. एका रात्री सर्वजण झोपलेले असताना ते महाल सोडून पडाले. त्या वेळी त्यांचे वय 29 वर्षे होते. 


त्यांनी आपले राजसी वस्त्र त्यागून संन्यास धारण केला व अनेक वर्षे कठीण तपश्चर्या केली. या गहन साधनेत लीन असताना निरंजना नदीच्या तीरावर एका पिंपळाच्या झाडाखाली बसलेले असताना त्यांना साक्षात्कार प्राप्त झाला. परम ज्ञानाची प्राप्ती करून ते समाधीत लीन झाले. बुद्धांनी ज्या वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती केली त्या वृक्षाला 'बोधीवृक्ष' म्हटले जाते.


वैशाख शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ यांना ज्ञान प्राप्त झाले व ते सिद्धार्थ चे गौतम बुद्ध बनले. यानंतर सारनाथ येथे त्यांनी आपला पहिला उपदेश दिला. बुद्धांची प्रवचने ऐकुन लोक प्रभावित होऊ लागले. हळू हळू राजा महाराज, सेठ आणि जन साधारण बौद्ध धर्माचे पालन करून त्यांच्या चांगल्या गोष्टी आचरणात आणू लागले. बुद्धांनी आपल्या धर्माचा प्रसार पाली भाषेत केला. ते वस्तूंच्या संग्रहाला पाप मानत असत.


आज जगभरात बौध्द धर्माला मानणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे व बौद्ध देशही अनेक आहेत. सम्राट अशोक यांनी ही बौद्ध धर्म स्वीकारून त्याच्या प्रचार प्रसारात महत्त्वाचे योगदान दिले. म्हणून आपल्यालाही भगवान बुध्दांच्या शिकवणीला आत्मसात करून आपले जीवन यशस्वी बनवायला हवे. 

भगवान बुद्ध मराठी निबंध- Gautam buddha essay in marathi (300 शब्द)

भगवान बुध्द ज्यांना गौतम बुद्ध म्हणूनही ओळखले जाते ते जगातील महान धार्मिक गुरूंपैकी एक होते. त्यांनी सत्य, अहिंसा, शांती, मानवता आणि समानतेचा संदेश दिला. त्यांची शिकवण आणि गोष्टी बोद्ध धर्माचा आधार आहेत. बौद्धधर्म हा जगभरातील प्रमुख धर्मांपैकी एक आहे. या धर्माचे अनुयायी मंगोलिया, थायलंड, श्रीलंका, जपान, चीन, बर्मा इत्यादी देशात मोठ्या प्रमाणात आहेत. 


बुद्धांचे लहानपणी नाव सिद्धार्थ होते. सिद्धार्थ लहानपणापासून चिंतनशील होते. ते त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध ध्यान आणि अध्यात्मिक रहस्या च्या शोधत होते. सिद्धार्थ यांचे वडील एक राजा होते व राजाचे पुत्र असल्याने त्यांना लहानपणापासूनच सर्व सुख सुविधा उपलब्ध होत्या. सिद्धार्थ यांच्या वडिलांना सिद्धार्थ च्या घर सोडण्याची चिंता लागलेली असे. म्हणून त्यांना नेहमी महलात ठेवून जगातील वास्तविकता लपवण्याची प्रयत्न केला जात असे.


बौद्ध परंपरेत उल्लेख केला आहे की एकदा सिद्धार्थ यांनी महालातून बाहेर पडून रस्त्यावर एक वृद्ध व्यक्ती, एक अस्वस्थ व्यक्ती आणि एक मृत प्रेत पाहिले. हे सर्व पाहिल्यावर ते अस्वस्थ झाले. त्यांच्या लक्षात आले की भौतिक व सांसारिक सुखांनी सत्य प्राप्त करता येणार नाही. म्हणून 29 वर्षाच्या वयात सत्याच्या शोधात त्यांनी आपले महाल सोडले व ते जंगलात गेले. तेथे ज्ञानाच्या प्राप्ती इकडून तिकडे फिरत असताना त्यांची भेट अनेक विद्वान संतांशी झाली. बुद्धांचा गृहत्याग इतिहासात 'महाभिनिशक्रमन' नावाने प्रसिद्ध आहे.


शेवटी सिद्धार्थ यांनी कठीण शारीरिक पिडा सहन करीत ध्यान आणि तप सुरू केले. जवळपास 6 वर्षे ध्यान केल्यानंतर सिद्धार्थ यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. गंगेच्या किनारी एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना सत्याचे दर्शन झाले. यानंतर त्यांचे नाव सिद्धार्थ चे भगवान बुद्ध झाले. भगवान बुद्धांना ज्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले त्या झाडाला बोधी वृक्ष म्हटले जाते. व त्या वृक्षाच्या सभोवतालच्या परिसराला बोध गया म्हटले जाते.


बुद्धांनी आपल्या तपश्चर्येचे सत्य प्राप्त केले होते. यानंतर काशी मधील सारनाथ येथे त्यांनी आपला पहिला उपदेश दिला. त्यांनी लोकांना सांसारिक दुखपासून दूर जाण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी लोकांना शिकवले की जीवनाचे शेवटचे लक्ष निर्वाण आहे. बुद्धांनी चांगले कर्म करण्याचा संदेश दिला. बौद्ध धर्म सत्य व अहिंसेवर आधारित आहे.