Skip to main content

माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी | Majha Avadta Prani Nibandh Marathi

माझा आवडता प्राणी Majha Avadta Prani marathi Nibandh

जगभरात अनेक पाळीव पशुपक्षी पाळले जातात. हे प्राणी मनुष्याच्या खूप कामात येतात. आपल्या देशात गाय, बैल, कुत्रा, मांजर, घोडा, उंट, गाढव, हत्ती इत्यादी प्राणी पाळले जातात. या सर्व प्राण्यांमध्ये माझा आवडता प्राणी घोडा आहे. आपल्या देशात घोड्याला अनेक कामांसाठी वापरले जाते. घोडा खूप शक्तिशाली असतो. तो माणसे तसेच अवजड वस्तूंना धरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतो. घोडा शक्तिशाली असण्यासोबतच बुद्धिमान देखील असतो. तो दीर्घकाळापर्यंत एकाच जागी उभा राहू शकतो. 


घोड्याचे शरीर सुडौल असते. तो दिसण्यात खूप सुंदर असतो. घोड्याचे स्नायू व पाय खूप मजबूत असतात ज्यामुळे तो 80 ते 90 किमी प्रति तास च्या वेगाने पळू शकतात. प्राचीन काळात युद्धावर जाण्यासाठी घोड्यांचा वापर केला जायचा. शिवाजी महाराज, महाराणा प्रताप इत्यादी महान राजांनी घोड्यांच्या सहाय्यानेच अनेक युद्ध लढली व जिंकलीही. शिवाजी महाराजांच्या आवडत्या घोड्याचे नाव कृष्ण होते. महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव चेतक होते. या घोड्याचे वेगामुळे महाराणा प्रताप यांनी अनेक युद्धे जिंकली. 


पुरातन काळापासूनच घोडे वाहतुकीचे साधन म्हणून वापरले जात आहेत. आधीच्या काळात अनेक ठिकाणी घोड्यांना शेतीसाठी देखील वापरले जायचे. घोडा हा कुत्र्या प्रमाणेच मालकाचे ऐकुन राहतो. मालकाच्या एका आवाजावर तो धावत येतो. घोड्याचे आयुष्य जवळपास 25 ते 30 वर्षांचे असते. परंतु एकोणावीसाव्या शतकातील ओल्ड बिली नावाचा एक घोडा 62 वर्षे आयुष्य जगाला होता. जगात सर्वात उच्च प्रजातीचे घोडे अरब देशात आढळतात. 


घोडे अनेक सुंदर रंगांमध्ये आढळतात. जसे काळे, भुरे,पांढरे, नीले इत्यादी. त्यांची सरासरी उंची 5 ते 6 फूट असते. घोड्याचे दोन्ही बाजूंना दोन डोळे असतात. जेव्हा घोड्याची स्वारी केली जाते तेव्हा त्याचे चित्ता भरकटू नये म्हणून डोळ्यांना झापडी लावली जाते. घोड्याची मान थोडी लांब असते. घोड्याला एक लांब शेपटी असते, या शेपटीवर बारीक बारीक केस असतात. अनेक ठिकाणी घोड्याच्या शेणापासून खत बनवले जाते. 


घोडा परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करीत असतो. रस्ता कच्चा, पक्का वा पहाडी क्षेत्र असो. घोडा सहजतेने सर्व समस्यांना तोंड देत जातो. जगभरात प्रसिद्ध खेळ पोलो खेळण्यासाठी घोड्यांचा वापर केला जातो. या शिवाय घोड्यांची शर्यतही जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत घोड्याला शक्तीचे प्रतीक मानले जाते. लग्नामध्ये नवरदेवाला घोड्यावर बसवले जाते.


आज वाढत्या वाहतुकीच्या साधनांमुळे घोड्यांचा उपयोग कमी झाला आहे. आजकाल घोड्यांना फक्त पहाडी व वन्य क्षेत्रात वापरले जाते. या शिवाय लग्न समारंभ, सर्कस व प्राणिसंग्रहालयात घोड्यांना ठेवले जाते.


Comments