Skip to main content

माझा आवडता अभिनेता / कलाकार मराठी निबंध | Maza Avadta Abhineta Nibandh Marathi

माझा आवडता अभिनेता / कलाकार मराठी निबंध | Maza Avadta Abhineta Nibandh Marathi


अमिताभ बच्चन 

तसे पाहता हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक अभिनेता व अभिनेत्री आहेत. प्रत्येकामध्ये काही न काही विशेषता आहे. भारताचा चित्रपट व्यवसाय हॉलिवुड नंतर जगातील सर्वात मोठा व्यवसाय आहे. म्हणूनच भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोक मुंबई शहरात येऊन अभिनय करण्याचे स्वप्न पाहतात. टीव्ही चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार कोणतातरी अभिनेता आवडतो. 


मला बॉलिवुड चे शहंशाह म्हणून ओळखले जाणारे जुने अभिनेता अमिताभ बच्चन आवडतात. ते माझे आवडते अभिनेता आहेत. अमिताभ बच्चन कोणतीही भूमिका अतिशय सहजपणे निभावतात. मग ती कॉमेडी असो वा ट्रॅजेडी, अँक्शन असो किंवा भावुकता. 78 वर्षाच्या वयातही त्यांचे डोळे चमकदार आणि आवाज दमदार आहे. नव्वदच्या दशकात अनेक नवनवीन कलाकार हिंदी चित्रपट सृष्टीत आले. परंतु बच्चन साहेबांची प्रसिद्धी अजिबात कमी झाली नाही. फक्त मीच नाही तर माझे पूर्ण कुटुंब अमिताभ बच्चन यांचे प्रशंसक आहेत. 


अमिताभ बच्चन हरिवंश राय बच्चन यांचे पुत्र आहेत. त्यांचे वडील एक प्रसिद्ध लेखक होते. ज्यामुळे अमिताभ बच्चन साहित्यिक वातावरणात वाढले. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पूना फिल्म येथे अभिनयाचे शिक्षण प्राप्त केले. सुरुवातीला अमिताभ बच्चन यांनी ख्वाजा अहमद अब्बास यांचा चित्रपट 'सात हिंदुस्तानी' मध्ये काम केले. या चित्रपटांमुळे त्यांची एक वेगळी ओळख बनत गेली. अमिताभ बच्चन यांच्या पहिला महत्त्वपूर्ण चित्रपट 'आनंद' होता. या चित्रपटाने पाहणाऱ्याच्या मनावर एक वेगळी छाप सोडली. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. यानंतर त्यांनी जंजीर, मुकद्दर का सिकंदर, कुली, अमर अकबर अँथनी, शोले, अभिमान, शराबी, इंकलाब इत्यादी एकाहून एक सुपरहिट चित्रपट केले व या नंतर त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहचून गेली.


अमिताभ बच्चन यांचे आजचे वय 78 वर्ष आहे तरही ते न थकता नवनवीन चित्रपटात काम करीत आहेत. इत्यादी अनेक कारणांमुळे अमिताभ बच्चन माझे आवडते अभिनेता आहेत.


Comments