Advertisement

[माझा आवडता छंद वाचन] मराठी निबंध। Maza Avadta Chand in Marathi

[माझा आवडता छंद वाचन] मराठी निबंध। Maza Avadta Chand in Marathi

मला जवळपास सर्व विषयांवरील पुस्तके वाचायला आवडतात. आत्मचरित्र आणि तात्विक माहिती असलेली पुस्तके मला जास्त आकर्षित करतात. याशिवाय मला प्रवासा वरील पुस्तके वाचायला आवडतात, ते मला संपूर्ण जग फिरवतात. वाचनातून आनंद आणि ज्ञान दोघेही मिळतात. जे मला खूप साऱ्या ठिकाणी मार्ग दाखवतात. पुस्तकांनी मला नम्र बनवले आहे. त्यांनी मला वेगवेगळ्या लोकांना ओळखण्यात मदत केली आहे. यामुळे वाचन हा माझा छंद बनलेला आहे.

प्रत्येक व्यक्तीची काही ना काही आवडते, यालाच छंद असे म्हटले जाते. छंद हे आनंद मिळवण्यासाठी जोपासले जातात. छंद जोपासल्याने कामात उत्साह वाढतो. माझा आवडता छंद पुस्तके वाचन आहे. मी गोष्टीची पुस्तके, साप्ताहिके, वर्तमानपत्र आणि इतर माहिती ची पुस्तके वाचतो. 

मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून वाचन हा माझा छंद आहे. माझ्या आई वडिलांनी पण हा छंद जोपासण्यात माझी सहायता केली आहे. मी लहान असताना माझ्या वडिलांनी मला छान छान गोष्टींची पुस्तके आणून दिली होती. लहान असतानाच बाराखडी ची पुस्तके वाचून मी वाचणे शिकलो होतो. त्यानंतर मी सोप्या सोप्या पऱ्यांच्या कथा व इतर लहान मोठ्या गोष्टी वाचू लागलो. 

नित्य वाचन केल्याने माझे ज्ञान वाढत आहे. नवनवीन गोष्टी शिकायला मिळतं आहेत. वैज्ञानिक माहिती असलेली पुस्तके मला वाचायला जास्त आवडतात. जगातील आश्चर्य, अंतरिक्ष ची माहिती, समुद्रातील तसेच धरतीवरील प्राण्यांची माहिती, तंत्रज्ञानातील नव नवीन शोध इत्यादी माहिती मी पुस्तकातून मिळवत आहे. 

वाचनाचा अजून एक फायदा असा आहे की आता माझी स्मरणशक्ती वाढली आहे शाळेच्या अभ्यासातील बऱ्याच गोष्टी मी आधीच वाचून टाकल्या आहेत. या मुळे मला कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाही. असे म्हणतात की वाचनाचे कोणतेही वय नसते, प्रत्येक वायातील व्यक्ती वाचन करू शकतो. 

मी वाचनाने निसर्गाबद्दल, झाडा झुडपांबद्दल अधिकाधिक मदहिती मिळवली आहे. प्राचीन काळाचा इतिहास मी वाचलेला आहे. आजच्या आधुनिक युगात तर एका क्लिक वर मोबाइल च्या सहायाने माहिती मिळवली जाते. आज कोणतीही माहिती हवी असल्यास ग्रंथालय मध्ये जाऊन पुस्तके शोधण्याची आवश्यकता देखील नाही. घरबसल्या तुम्ही मोबाइल मध्ये माहिती शोधू शकतात.    

माझे मत आहे की जो व्यक्ति पुरेसे वाचन करतो तो स्वतःला दुसऱ्यासोबत लवकर मिसळून घेतो. इतर लोकांच्या तुलनेत असा व्यक्ति चांगले संभाषण करतो. या मागे कारण एवढेच आहे की वाचनाने आपली बुद्धी अधिक तेज होते. माझ्या दृष्टीत तरी वाचनाची सवय ही सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. वाचकाची पुस्तके खूप चांगली मित्र असतात. व पुस्तक वाचक कधीही एकटा नसतो. जरी व्यक्तीकडे खूप सारे धन असले तरी जर त्याच्याकडे ज्ञान नसेल तर तो दारिद्रच राहतो. 

पुस्तके वाचकापुढे खूप सारी माहिती आणि नवनवीन तथ्य ठेवत असतात. ही माहिती आपल्याला रोजच्या कार्यामध्ये मदत करते. म्हणून मी वाचनाची ही आवड कायम जोपासत राहील व नवनवीन माहिती मिळवत राहील.