Skip to main content

माझा आवडता खेळ लंगडी मराठी निबंध | Maza avadta khel langdi

माझा आवडता खेळ लंगडी मराठी निबंध | Majha avadta khel langdi essay in marathi

आपल्या भारत देशात आणि जगभरात अनेक खेळ खेळले जातात. यातील काही खेळ आंतरराष्ट्रीय तर काही स्थानिक आहेत. काही खेळांचे सामने आंतरराष्ट्रीय पातळीवर होतात तर काही स्थानिक पातळीवर लोकांद्वारे खेळले जातात. या खेळांना मान्यता मिळाली नसूनही हे त्यांच्या विशिष्ट भागात प्रसिद्ध असतात.


अशाच प्रसिद्ध खेळापैकी एक आहे लंगडी. लंगडी हा एक भारतीय मैदानी खेळ असण्यासोबतच माझा आवडता खेळ आहे. आपल्या देशात साधारणतः सहा-सात ते तेरा-चौदा वयोगटातील मुले व मुली हा खेळ खेळताना दिसतात. जास्त करून मुलींद्वारे हा खेळ खेळला जातो. खेळासाठी लागणारे छोटेसे मैदान, कमीत कमी व साधे सोपे नियम यामुळे हा खेळ लहान मुलामुलींमध्ये विशेष आवडीचा आहे. आज काल या खेळाला लहान मुलांसाठी प्राथमिक शाळांच्या आंतरशालेय स्पर्धेत घेण्यात आले आहे. 


मी दररोज माझ्या वर्गातील तसेच गावातील मैत्रिणी सोबत लांगडी खेळते. लंगडी खेळण्यासाठी 12.19 मी. चौरस क्रीडांगण बनवण्यात येते. या क्रीडांगणाच्या एका बाजुच्या कोपर्यावर प्रवेशाची खूण असते. या खेळात ज्याच्यावर डाव आला आहे तो व्यक्ती लंगडी घालतो. आणि लंगडीघालीत आपल्यासमोर असलेल्या 5 ते 7 प्रतिस्पर्धी लोकांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. लंगडी करणाऱ्याला दुसरा पाय जमिनीवर ठेवण्याची परवानगी नसते.  पळणाऱ्या खेळाडूंपैकी जर एखादा खेळाडू मैदानाबाहेर गेला तर तो बाद होतो. आणि अशा पद्धतीने या खेळाला खेळले जाते.


लंगडी खेळत असताना शरीराचे संपूर्ण वजन एकाच पायावर बॅलेन्स करावे लागते. ज्यामुळे शरीराचे संतुलन वाढते. या खेळात पायाचे सगळे स्नायू आणि सांधे देखील वापरले जातात. ज्यामुळे त्यांचा चांगलाच व्यायाम होतो. या शिवाय खेळत असताना निरंतर पळत राहावे लागते. ज्यामुळे संपूर्ण शरीराचाच व्यायाम होतो. लंगडी खेळल्याने मला खूप प्रसन्न वाटते. हा खेळ सुदृढ शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे. लंगडी खेळल्यानंतर माझे अभ्यासात एकाग्र चित्त लागते. लंगडी खेळामुळेच माझे चित्त संतुलित राहून अभ्यास लक्षात ठेवायला मदत मिळते. 


याशिवाय मला लंगडी आवडण्यामागे अनेक कारणे आहेत. या खेळाला खेळण्यासाठी जास्त जागेची गरज लागत नाही. घराच्या पुढील मोकळ्या जागेत देखील याला खेळाला खेळले जाऊ शकते. याला खेळण्यासाठी काहीही साहित्य लागत नाही. ज्यामुळे खर्च देखील होत नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर लंगडी हा शून्य खर्चात जास्त फायदा करून देणारा खेळ आहे. माझी इच्छा आहे की शासनाने ह्या खेळाला राष्ट्रीय तसेच पुढे आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये शामील करायला हवे.


Comments