Advertisement

निबंध माझा आवडता पक्षी मोर वर मराठी निबंध | Maza Avadta Pakshi Mor Marathi Nibandh

माझा आवडता पक्षी वर निबंध (Majha Avadta Pakshi Mor)

जगभरात अनेक पक्षी व पक्षाच्या जाती आढळतात. काही पक्षी इतके सुंदर आणि मनमोहक असतात की त्याचे सौंदर्य पाहताच राहावे असे वाटते. मला देखील पक्षी पाहणे आवडते. माझा आवडता पक्षी मोर हा आहे. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोर हा दिसण्यात सुंदर आणि आकर्षक असतो. त्याला जास्त उंच उडता येत नाही म्हणून तो कायम जमिनीवरच राहतो. 


मोर पक्षी इतर पक्षांच्या तुलनेत मोठा असतो. त्याच्या शरीरावर आकर्षक पंख असतात. या पंखांना मोरपीस म्हटले जाते. मोर त्याच्या सुंदर पंखांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. पावसाळ्याच्या दिवसात मोर आपला पिसारा फुलवून नृत्य करतो. मोराचे हे नृत्य मनाला मोहून घेते त्याचे नृत्य पाहणारा पाहतच राहून जातो. मोराचे वजन 5 किलोपर्यंत असते. त्याचे संपूर्ण शरीर निळ्या रंगाचे असते. 


संपूर्ण भारतात मोर आढळतात. ते जास्तकरून नदी तसेच इतर पाण्याच्या जलस्त्रोतांजवळ राहतात. मोर खूप कमी उडतात, जेव्हा त्याच्या जीवाला धोका असेल तेव्हाच एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर किंवा एका किनाऱ्यावरून दुसर्‍या किनार्‍यावर उडून जातात. मोर हे अन्न म्हणून धान्याचे दाणे, झाडाची पाने, फळे, किडे, साप, पाल या गोष्टी आवडीने खातात. 


ग्रामीण भागात बऱ्याचदा मोर शेतातील पिकाचे नुकसान करून जातात. म्हणून शेतकरी त्यांना पळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करीत असतात. मोर आपले घर जमिनीवरच बनवतात, घर बनवण्यासाठी ते जमिनीवर असलेल्या झाडांच्या फांद्या व लाकडी दांड्या वापरतात. एका वेळेला ते 3 ते 5 अंडे देतात. 


मोर खूपच आकर्षक असतो व प्रत्येक व्यक्तीला मोर पाहायला आवडतो. मोर फक्त भारताचाच नव्हे तर म्यानमार चा देखील राष्ट्रीय पक्षी आहे. आणि माझ्या आवडता पक्षी पण मोर आहे.