Advertisement

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध। Maza Avadta Prani Manjar Marathi Nibandh

माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी (Essay on cat in marathi) (156 शब्द)

माझा आवडता प्राणी मांजर. मांजर एक घरगुती प्राणी आहे ती खूपच सुंदर आणि गोंडस असते. मांजरांच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या जाती असतात. काही मांजरी काळ्या असतात तर काही पांढर्याशुभ्र. मांजरीची त्वचा पण वेगवेगळी असते. काही मांजरांचे केस लांब असतात तर काहींचे लहान असतात. मांजरीचे पूर्ण शरीर केसांनी झाकलेले असते. 


मांजर दिसण्यात लहान वाघासारखी असते. खरे पाहता ती वाघांच्या प्रजातीची सदस्य आहे. तिला वाघाची मावशी पण म्हटले जाते. मांजरीला उंदर खायला खूप आवडतात. तिला दूध प्यायला पण आवडते. मांजर मांसाहारी आणि शाकाहारी दोघी प्रकारचे अन्न खाते. तसं तर मांजर ही हिंसक नसते, पण कधीकधी ती घरातील सदस्यांना नुकसान पोहचवू शकते म्हणून मांजरी पासून सावधान राहायला हवे.


मांजरीचे डोळे चमकदार असतात, तिचे डोळे भुरे किंवा हिरव्या रंगाचे असतात. मांजरीचे डोळे रात्रीच्या अंधारात चमकतात. त्यामुळे मांजर कमी उजेडात किंवा रात्रीच्या वेळी पण दिसून जाते. रस्त्याने चालताना जर मांजर आडवी गेली तर लोक याला अशुभ मानतात. पण हा एक अंधविश्वास आहे. मांजरीला कुत्र्यापासून खूप भय वाटते कारण कुत्रे मांजरीला खाऊ शकतात.


माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी (maza Avadta Prani Manjar) (३०० शब्द)

मांजरी अतिशय सुंदर आणि गोंडस प्राणी आहे. तिला माणसांसोबत राहायला आवडते. मांजर जवळपास सर्व देशांमध्ये पाळली जाते. ज्या घरात मांजर असते तिथं उंदीर त्रास देत नाहीत. मांजरीला आराम करायला खूप आवडते. यामुळे तिला आळशी प्राणी म्हणून सुद्धा संबोधले जाते. पण तरीही मांजरीचे शरीर खूप लवचिक असते व तिच्यात स्फूर्ती देखील खूपच असते.


मांजरीचे शरीर लहान व नरम केसांनी झाकलेले असते. पहिल्या दृष्टीत मांजर लहान वाघाप्रमाणे दिसते. मांजरीचे शरीर खूप लवचिक आणि मजबूत असते. यामुळे ती उंच उड्या मारू शकते. उंची वरून पडली तरी तिच्या शरीराला इजा होत नाही. मांजरीला चार पाय असतात. तिच्या या पंज्यामध्ये तीक्ष्ण नखे असतात. या नखांच्या मदतीने ती तिच्या शिकारला पकडते. मांजरीला उंदीर खायला आवडते. मांजर पांढरा, काळा आणि भुर्या रंगाची असते. मांजरीचे डोळे चमकदार असतात या डोळ्यांमुळे ती रात्रीच्या अंधारात पण पाहू शकते. 


अन्य प्राण्या प्रमाणेच मांजरीचे जीवन पण असते. तिचा स्वभाव चांगला असतो. ती माणसाचे हावभाव समजते. पण जंगली मांजरीचा स्वभाव थोडा हिंसक असतो, म्हणून या मांजरी माणसावर आक्रमण पण करू शकतात. ज्यावेळी मांजर खुश असते तेव्हा ती आपली शेपटी हलवून प्रतिक्रिया करते. मांजर उंदीर शिवाय मासे, चिमणी, कबुतर, दूध, पोळी इ पण अन्न म्हणून खाते. मांजर दिवसभर इकडून तिकडे उड्या मारत असते. ती खूपच चपळ असते.


जगभरात मांजरीची 50 करोड पेक्षा जास्त संख्या आहे. मांजरीचा स्वभाव खूपच चांगला असतो. आपण सुद्धा मांजरीला प्रेमाने ठेवायला हवे. जपान मध्ये मांजरीला शुभ मानले जाते पण भारतात आज देखील बरेच लोक मांजरी द्वारे रस्ता आडवा गेला तर अशुभ मानतात.