Skip to main content

माझा आवडता प्राणी सिंह | Maza Avadta Prani Sinha

सिंह मराठी निबंध - Maza Avadta Prani Sinha

आपल्या देशात वेगवेगळ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या जाती पाहायला मिळतात. काही प्राणी हिंस्त्र असतात तर काही पाळीव असतात. पण सिंहाला जंगलाचा राजा म्हटले गेले आहे. सिंह एवढा शक्तिशाली असतो की खूप असानी ने तो त्याच्या पेक्षा मोठ्या प्राण्यांची शिकार करून टाकतो. सिंह हा हरण, जिराफ, जंगली म्हशी, हत्ती या सारख्या मोठमोठ्या प्राण्यांची शिकार सुद्धा करतो. 


सिंह मासाहरी असतो आणि शाकाहारी प्राण्यांना खाऊन तो आपली भुख भागवतो. सिंह जास्त करून रात्रीच्या वेळी शिकार करतो, रात्री शिकार करण्याचा फायदा असा असतो की रात्री अंधाऱ्या मुळे सिंह हा इतर प्राण्यांना व्यवस्थित दिसत नाही आणि ज्यामुळे काही क्षणातच सिंह त्याचा शिकाराला ठार करतो. जास्त करून शिकार सिहिणी द्वारा केले जातात. सिंह आपल्या क्षेत्रात दुसऱ्या सिंहांना येऊ देत नाही, बऱ्याचदा क्षेत्र वरून त्यांच्यात युद्ध आणि वाद विवाद देखील होतात. एका वयस्क सिंहाची लांबी 3.5 फूट असते आणि उंची 10 फूट पर्यंत असते. सिहाचे वजन 120 किलो पर्यंत असते. त्याच्या जबड्यात 30 दात असतात. सिंहाची दात खूप मजबूत असतात आणि हेच दात त्याच्या शिकारला ठार करण्यासाठी उपयोगी पडतात. सिंह 40-80 किलोमीटर प्रती तास च्या वेगाने धावू शकतो. सिंहाची डरकाळी 8 किलोमीटर दुरूनही ऐकू येते.


आज जंगलाचा राजा असताना देखील सिंहाची संख्या लगातार कमी होत आहे. याचे मुख्य कारण सिंहाची वाढती शिकार व जंगलांची तोड आहे. भारतात सिंहाची प्रजात विलुप्तीच्या मार्गावर आहे. पण वर्ष 2010 पासून आता ही संख्या वाढत आहे सरकार व वनविभाग या कडे विशेष लक्ष देत आहे. जी एक चांगली बाब आहे.


Maza Avadta Prani Sinha

जगभरात वेगवेगळे प्राणी आणि प्राण्यांच्या जाती आढळतात. परंतु सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते. त्याला इंग्रजीत लायन असे म्हणतात. सिंह हा दिसण्यात खूपच हिंसक आणि भयानक असतो सिंह च्या एका डरकाळी ने संपूर्ण जंगल घाबरायला लागते. यामुळेच सिंहाला प्राण्यांचा राजा म्हटले जाते. सिंह खूपच बहादुर व शूरवीर प्राणी आहे या मुळेच मला सिंह हा खूप आवडतो व माझा आवडता प्राणी सिंह आहे.


सिंहाचे वैज्ञानिक नाव पँन्थेरा लिओ असे आहे. सिंह मांसाहारी असतो, तो जंगलातील कोणत्याही प्राण्याची शिकार करू शकतो. म्हणून त्याला जंगलाचा व सर्व प्राण्याचा राजा म्हटले जाते. सिंहाचे शरीर मजबूत असते. तो 80 किलोमीटर प्रतितास या वेगाने पळू शकतो. सिंहाची डरकाळी 6 ते 7 किलोमीटर दूरनही एकायला येते. त्याच्या मानेवर मुलायम केस असतात या केसांना आयाळ म्हणतात. सिंहाच्या तोंडात 32 दात असतात हे दात मानवी बोटा पेक्षा मोठे असतात. त्याचे दात तेज व धारदार असतात, या दातांच्या मदतीने तो आपल्या शिकाराला घट्ट पकडून ठेवतो. सिंहाच्या तुलनेत सिंहीण जास्त शिकार करते. 


एका वयस्क सिंहाची उंची साडेतीन फूट पर्यंत असते. त्याचे वजन 190 किलो पर्यंत असू शकते. सिंह हा सरासरी वीस वर्षांपर्यंत जगतो. परंतु प्राणिसंग्रहालयात असणारे सिंह आठ ते दहा वर्षे जगतात. सिंहाला पाळणे, बंदी बनवून ठेवणे किंवा शिकार करणे भारतात गैरकानूनी आहे. जर कोणी सिंहाची शिकार करीत असेल तर त्याला दंड व तुरुंगातील शिक्षेचा नियम आहे.


जंगलाचा राजा असताना देखील सिंहाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे जंगलतोड व शिकारी द्वारे होत असलेली बेकायदेशीर शिकार. परंतु सरकार चे नियम व वन्य जीव संरक्षण योजनेमुळे आता भारतात सिंहाची संख्या वाढत आहे. 2010 साली भारतातील एकूण सिंहांची संख्या 411 होती तर 2015 मध्ये ही संख्या वाढून 523 होऊन गेली. सिंह हा पृथ्वीवरील सर्वात महत्वपूर्ण प्राण्यांपैकी एक आहे म्हणून त्याच्या रक्षणाची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारायला हवी.


Comments