Advertisement

माझी सहल निबंध | mazi Sahal Essay in marathi (400 शब्द)

माझी सहल निबंध | mazi Sahal Essay in marathi (400 शब्द)

मनुष्याला प्राचीन काळापासूनच फिरण्याची आणि भटकंतीची सवय आहे. ही भटकंती मनुष्याचा स्वभावच बनली आहे. प्राचीन काळातील मानव अन्न आणि आश्रया च्या शोधात फिरायचा याउलट आधुनिक मानव मनोरंजन, ज्ञानप्राप्ती इत्यादी कारणांसाठी प्रवास करतो. असाच एक प्रवास करण्याची संधी मलाही मिळाली ही संधी होती आमची सहल. या सहली ची प्रत्येक विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होता व शेवटी सहलीचा दिवस निश्चित झाला. 


या वर्षी आमच्या शिक्षकांनी वॉटर पार्कमध्ये सहल नेण्याचा निर्णय घेतला होता. हा वॉटर पार्क आमच्याच शहरात स्थित होता. म्हणून त्या ठिकाणी पोहोचायला जास्त वेळही लागणार नव्हता. ही सहल मनोरंजन आणि रोमांच ने भरलेली होणार होती. सहलीच्या एक दिवस आधीच सरांनी आम्हाला सर्व आवश्यक सूचना दिल्या. सर्वांना सकाळी 10 वाजता शाळेत जमायचे होते व यानंतर शाळेतूनच बस प्रवास करीत वॉटर पार्कमध्ये नेणार होती. 


आम्ही सर्वजण ठरलेल्या वेळेनुसार दहा वाजता शाळेत जमलो. बस भरली आणि वॉटर पार्क कडे निघाली. आम्ही मित्रांनी आपले आपले स्विमिंग सुट सोबत घेतले होते. वॉटर पार्क दररोज 11 ते 5 उघडे राहायचे एक तासात आम्ही तेथे पोहोचलो तेवढ्यात ते उघडून गेले होते. वॉटर पार्क मध्ये प्रवेश करताच मी व माझ्या मित्रांनी पूर्णपणे एन्जॉय करणे सुरू केले. राक्षसाचे तोंड, आळशी नदी, फ्री फॉल, लूप हॉल असे एक न अनेक वेगवेगळे ठिकाण त्या वॉटर पार्क मध्ये स्थित होते. पाण्यात कितीही खेळा मन भरतच नाही आणि तशीच अवस्था आमची देखील झाली होती. मी तर उंच उंच घसरगुंडीवरून खाली येत होतो. 


शेवटी 1 वाजला आता जेवणाची वेळ झाली होती. जेवणाची व्यवस्था शाळेकडून करण्यात आली होती. गुलाबजाम व अनेक स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी आम्हाला मिळाली होती. आमच्या सरांनी वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे 5-5 असे 8 गट बनवले होते आणि प्रत्येक गटात एक लीडर होता. लिडर चे काम आपल्या गटातील विद्यार्थ्यांनी वर लक्ष ठेवणे व त्यांची माहिती शिक्षकांना देणे असे होते. आणि माझ्या गटाचा लीडर मलाच बनवण्यात आले ज्यामुळे माझ्यावर माझी आणि आमच्या गटातील मुलांची जबाबदारी होती. म्हणून मी थोडा चिंतित ही होतो. परंतु काहीही समस्या निर्माण झाली नाही 5 वाजेपर्यंत आम्ही खूप मजा केली आणि आता वॉटर पार्क बंद होण्याची वेळ झाली होती. शिक्षकांनी आम्हा सर्वांना बाहेर निघण्याची सूचना दिली बाहेर आल्यावर सर्व ग्रुप आपापल्या लीडर सोबत उभे राहिले. सरांनी सर्व विद्यार्थी मोजले व नंतर बस मध्ये बसून आम्ही पुन्हा शाळेकडे च्या प्रवासाला निघालो आणि शेवटी 06-6:30 च्या सुमारास मी घरी पोचलो. 


सहल हे मित्रांसोबत घालवलेले मनोरंजक आणि नेहमी स्मरण रहाणारे क्षण असतात. सहल ही थकलेल्या मनाला नवीन ऊर्जा मिळवून देते. रोजच्या अभ्यासापासून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून सहल आयोजित केली जाते. सहलीचा आनंद मिळवल्यानंतर विद्यार्थी एका नवीन उत्साह आणि जोमाने अभ्यासाला लागतात. म्हणून प्रत्येक शाळेत वर्षातून एकदा तरी सहलीचे आयोजन करायला हवे.

--समाप्त--