Skip to main content

मी सैनिक झालो तर निबंध मराठी - Mi Sainik Zalo tar Marathi Essay nibandh

कोणत्याही देशाची सेना ही देशाची सर्वात मोठी शक्ति असते. देशाच्या सुरक्षेची जवाबदारी एक एक सैनिकावर असते. जर सेनेचा आत्मविश्वास कमी झाला तर त्या देशाचे भविष्य धोक्यात असते. एक चांगला सैनिक तोच असतो जो कोणत्याही परिस्थितीत धैर्य न हरता, स्वताच्या प्राणांची पर्वा न करता देशासाठी कार्य करतो. आज आपण पाहणार आहोत जर मी सैनिक झालो तर या विषयावर मराठीतून निबंध. तर चला सुरू करू... 

मी सैनिक झालो तर 

माझ्या जीवनाचे एक लक्ष्य सैनिक बनणे ही आहे. जर मी सैनिक झालो तर खूप चांगले होईल. अधिकांश विद्यार्थी मोठे झाल्यावर डॉक्टर, इंजिनीअर, कलेक्टर, शिक्षक इत्यादी बनण्याचे स्वप्न पाहत असतात. परंतु माझी स्वप्न सैनिक बनणे आहे. लहानपणापासूनच मला देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे. जेव्हा मी प्राथमिक शाळेत शिकत होतो, तेव्हापासूनच माझे वडील मला सांगत असत की तुला देशासाठी काहीतरी करून दाखवायचे आहे. 


आज आपल्या देशात खूप सार्‍या समस्या निर्माण झाल्या आहेत. शत्रु देशांमुळे दररोज काही ना काही समस्या उभी राहत आहे व यासाठी आपल्या देशाचे सैनिक नेहमी प्रयत्न करीत असतात. जर मी सुद्धा एक सैनिक राहिलो असतो तर देशाच्या सुरक्षेसाठी मी प्राणांची पर्वा न करता लढलो असतो. देशाचे होत असलेले नुकसान रोखण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न केले असते. देशाच्या सैनिकावर संपूर्ण देशाची जबाबदारी असते. एक सैनिकच देशाच्या भल्यासाठी कार्य करतो. 


जर मी सैनिक राहिलो असतो तर मला कुटुंबापासून दीर्घकाळासाठी लांब राहावे लागले असते. परंतु या गोष्टीचे मला अजिबात दुःख राहिले नसते. कारण मी माझ्या देशाच्या सुरक्षेसाठी घरापासून दूर गेलो असतो यामुळेच माझे कुटुंब ही दुःख व्यक्त न करता अभिमानाने राहिले असते. त्यांना सर्वांना आनंद झाला असता कि मी देशासाठी काहीतरी करीत आहे. जरी मी माझ्या समाजापासून दूर राहिलो असतो तरी वेगवेगळ्या ठिकाणच्या फौजी मित्रांशी माझी मैत्री झाली असती.


जर मी एक सैनिक राहिलो असतो तर सर्वच लोकांनी माझा सन्मान केला असता. जेव्हा जेव्हा मी माझी ड्युटी संपवून घरी आलो असतो तेव्हा गावातील सर्व लोकांनी माझे उत्साहाने स्वागत केले असते. अशा पद्धतीने एक सैनिक बनवून मी माझे व माझ्या कुटुंबाचे नाव उज्वलीत केले असते. आपल्या देशात असे भरपूर सैनिक आहेत जे देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वाही करीत नाही. मी पण त्याच सैनिकांप्रमाणे देशाच्या रक्षणासाठी जीवनाची पैज लावली असती.

Mi Sainik Zalo tar

जरी मी एक दिवस सैनिक बनलो असतो तरी मला माझ्या शरीरावर अभिमान वाटला असता. सैनिकाचा गणवेश माझ्यामध्ये देशभक्ती निर्माण करतो. ज्या दिवशी मी एक सैनिक बनून जाईल त्या दिवशी माझे आई-वडील, गुरुजन तसेच संपूर्ण देशाला माझ्यावर अभिमान असेल. 


मी जर सैनिक झालो तर स्वतः आधी देशाला महत्त्व देईल. देशाच्या सेवेसाठी तन-मन-धनाने प्रयत्न करील. माझे कौटुंबिक व व्यक्तिगत मुद्दे बाजूला ठेवून मी देशाबद्दल विचार करील. माझी इच्छा आहे की आपला देश भारत प्रत्येक दिवस एका सणाच्या रूपाने साजरा करो. भारताचा एक नागरिक असल्याकारणाने हे माझे कर्तव्य आहे कि मी आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान देताना मागे पुढे विचार करायला नको. हानीकारक विचार असलेला कोणताही व्यक्ती माझ्या देशात पाय ठेवू शकणार नाही. मी आपल्या देशाला नुकसान पोहोचवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला जिवंत राहू देणार नाही.


युद्धकाळात मी युद्ध मैदानात अधिकाधिक सेवा दिली असती. भेकडा प्रमाणे पळून जाण्याऐवजी मी शहिदाचा मृत्यू पत्करला असता. युद्धकाळात मी माझ्या सैनिक मित्रांची मदत करण्यासाठी मागेपुढे विचार केला नसता. मी पूर्णपणे निर्भय होऊन शत्रूशी लढलो असतो. मी कधीही शत्रूसमोर समर्पण केले नसते. देशाशी विश्वास घात करणे मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. मी देशाला पुरस्कृत करण्यासाठी प्रयत्न करेल, कारण शेवटी मला जे काही मिळाले आहे ते या देशामुळेच मिळाले आहे.


Comments