Advertisement

माझा महाविद्यालयातील पहिला दिवस | My first day in college essay in marathi

माझा महाविद्यालयातील/ कॉलेज चा पहिला दिवस मराठी निबंध  Mahavidyalayatil pahila divas nibandh

माझ्या गावाच्या शाळेत शिकत असताना मी विचार करायचो की जेव्हा मी 12 वी उत्तीर्ण होईल तेव्हा दुसऱ्या शहरातील छानश्या महाविद्यालयात शिक्षणासाठी जाईल. मला हा विचार करून खूप आनंद व्हायचा. काही काळानंतर मी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालो. घरातील सर्वजण आनंदी होते. मलाही आता नवीन कॉलेज मध्ये जाण्याचा आनंद होता. माझ्या माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी एक डॉक्टर बनावे. व खूप प्रयत्नानंतर त्यांनी माझा प्रवेश भारती विद्यापीठ पुणे येथे करून दिला. पुण्यात आमचे कोणतेही नातेवाईक वास्तव्यास नसल्याने मला भाड्याने रूम करावा लागला. सुरुवातीला काही दिवस माझे मम्मी पप्पा पण माझ्या सोबतच होते. 


आज माझा महाविद्यालयातील पहिला दिवस होता जेवण करून दुपारी अकरा वाजता मी घरातून निघालो. माझ्या मनात विचार सुरू होते की कॉलेज मधील वातावरण कसे असेल? माझे वर्गमित्र कसे असतील? मनात आनंद तर होताच परंतु थोडी भीतीही वाटत होती. कारण पहिल्यांदाच मी एवढ्या मोठ्या महाविद्यालयात आलो होतो. कॉलेजच्या जवळ पोहचलो तर पाहिले तेथे एक मोठेच गेट होते. ज्याच्या मध्ये जाण्यासाठी आणखी एक लहान गेट होते. मी त्या गेट वाटून आत गेलो. 


आता खूप सारे विद्यार्थी उभे होते. मी पण त्यांच्यामध्ये जाऊन उभा राहिलो. त्यांच्यातील बहुतेक विद्यार्थी महाविद्यालयात नवीन होते. परंतु त्यांच्या व्यवहारावरून असे वाटत होते की ते फार पूर्वीपासून एक दुसऱ्याला ओळखत आहेत. येवढेच नव्हे तर मुलीही एकमेकांशी अतिशय मोकळ्या गप्पा मारीत होत्या. परंतु मी मात्र शांत उभा होतो. यानंतर मी बाजूला काम करीत असलेल्या एका प्युनला माझ्या वर्गबद्दल विचारले व त्यांनी मला संगितले. 


आता मी माझ्या वर्गात जाऊन पोहचलो. पाहतो तर काय वर्गात आधीच मुले आलेली होती. जवळपास 60-70 माझ्यासारखेच मुले मुली वर्गात बसलेले होते. मी सुद्धा एका मागील बेंच वर जाऊन बसून गेलो. इतक्यात माझे लक्ष माझ्याच शहरातील लोकेश कडे गेले. शाळेत असताना लोकेश व मी सोबत होतो. लोकेशला पाहून मला खूप आनंद झाला. कारण या अनोळखी कॉलेजमध्ये तो एकमेव माझ्या ओळखीचा व्यक्ती होता. मी त्याच्या जवळ जाऊन बसलो मला पाहून तो देखील आनंदित झाला. इतक्यात आमचे शिक्षक वर्गात आले, सरांना पाहून सर्वजण उभे राहीले. लगेच त्यांनी सर्वांना खाली बसण्याचा इशारा केला. 


सरांनी एक रजिस्टर उघडून ऍडमिशन झालेल्या नवीन मुलांची नावे घेणे सुरू केले. त्यांनी सर्वांची नावे घेतली परंतु माझे नाव आले नाही. जशे त्यांनी रजिस्टर बंद केले तसा मी उभा राहिलो त्यांना म्हणालो सर माझे नाव तुम्ही घेतले नाही. सरांनी मला माझे नाव विचारले व रजिस्टर मध्ये लिहून घेतले. यानंतर त्यांनी सर्वांचा परिचय ऐकून घेतला.


हळू हळू आम्ही सर्व एकमेकांना परिचित होऊ लागलो. आमच्या शहरातून पाच मुले व दोन मुली येथे शिकायला आले होते. पहिल्याच दिवशी माझे चार-पाच मित्र बनून गेले होते. माझा कॉलेज चा दिवस खूप छान होता. संध्याकाळी चार वाजता मी कॉलेजमधून घरी परत आलो. परंतु मला हा दिवस नेहमी आठवण राहिला.

***