Advertisement

माझे गाव मराठी निबंध [स्वच्छ गाव निबंध] | My village essay in marathi

माझे गाव मराठी निबंध [स्वच्छ गाव निबंध] | My village essay in marathi

माझे गाव मराठी निबंध | My village essay in marathi

My village essay in marathi : गांव म्हटले म्हणजे हिरवळ, पक्ष्यांची किलबिलाट, प्राण्यांचे आवाज आणि अद्भुत निसर्ग सौन्दर्य. शहरातील धावपडीच्या जीवनापेक्षा गावातील शांत जीवन कधीही चांगलेच असते. जास्त करून लोकांचा जन्म खेड्या गावातच झालेले असतो. नंतरच्या काळात नौकरी तसेच शिक्षणामुळे त्यांना शहरात वास्तव्यास यावे लागते. परंतु तरीही तुम्हास आपल्या गावचा विसर पडू नये म्हणून ह्या लेखात आम्ही आपल्यासाठी (maza gaon nibandh) माझे गाव निबंध मराठी घेऊन आलो आहोत हा निबंध एकदा नक्की वाचा अन आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. 

माझे गाव मराठी निबंध | my village essay in marathi 

मी व माझे आई वडील सुट्ट्यांच्या दिवसात गावी जातो. माझ्या गावाचे नाव महाराष्ट्रातील जामखेड आहे. माझे गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप लहान आहे. गावात माझे आजी बाबा शेती करतात. तेथे त्यांचे एक घर आहे. मला गावी गेल्यावर खूप शांत आणि आनंदी वाटते. माझ्या गावाच्या चारही बाजूंना हिरवी शेत आहेत. या शिवाय अनेक हिरवी झाडे झुडपे प्रत्येक घरासमोर आहेत. माझ्या गावातील सर्व लोक एकमेकांसोबत मिळूनमिसळून राहतात. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन आहे. 


माझ्या गावात एक मोठी नदी आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये दुपारी मी या नदीत आंघोळीला जातो. नदीच्या किनाऱ्यावर एक मंदिर आहे या मंदिराच्या ओट्यावर दररोज संध्याकाळी गावातील वृद्ध लोक बसलेले असतात. या शिवाय गल्लीतील लहान मुले येथे खेळताना दिसतात. माझ्या गावात एक शाळा देखील आहे पण तेथे फक्त पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. पुढील शिक्षणासाठी मुळे जवळच्या तालुका किंवा जिल्ह्याच्या शहरात जातात.


माझ्या गावात प्रसिद्ध भगवान शंकराचे मंदिर आहे. श्रावण महिन्यात या मंदिराच्या पटांगणात मोठी जत्रा भरते. भगवान शंकराच्या दर्शनासाठी दुरून दुरून लोक इथे येतात. या दरम्यान गावात कपडे, दागिने आणि खेळणीची मोठमोठी दुकाने लागलेली असतात. म्हणून आजूबाजूच्या गावातील लोक आमच्या गावात येऊन खरेदी करतात. माझ्या गावात खूप सारे मोकळे मैदान आहेत येथे आम्ही क्रिकेट तसेच इतर खेळ खेळतात. माझ्या गावात खूप कमी प्रमनात वाहने चालतांना दिसतात. म्हणून येथील प्रदूषणाचे प्रमाण खूप कमी आहे. मला शेतांमध्ये जाऊन बसायला खूप आवडते. माझ्या गावातील हवा खूप शुद्ध आहे. शुद्ध हवे मुळे गावातील सर्व लोक निरोगी आणि दीर्घायुषी आहेत. 


माझ्या गावात आधुनिकीकरण नसल्यामुळे गावातील जास्त रस्ते हे मातीचे आहेत. माझी इच्छा आहे की मी मोठा झाल्यावर इंजिनीयर बनून गावाचे रस्ते व इतर विकासाची कामे पूर्ण करील. मला माझे गाव खूप आवडते. माझे गाव स्वच्छ गाव आहे व माझे गाव सर्वात सुंदर आहे.

--समाप्त--