Advertisement

[वाचनाचे महत्व] वाचाल तर वाचाल निबंध मराठी | Vachanache Mahatva Essay in Marathi

वाचाल तर वाचाल निबंध | Vachal tar vachal Marathi Nibandh

जीवनात यश, सम्मान व ओळख मिळवण्यासाठी शिक्षण खूप उपयुक्त आहे व शिक्षणात एक महत्वपूर्ण भाग पुस्तके बजावत असतात. कारण पुस्तके आपल्याला ज्ञान देतात. पुस्तके आपले चांगले मित्र असतात. पुस्तके वाचनाने ज्ञान सोबत मनोरंजन पण होते. आपल्या नित्य शैलीत आपण दररोज काही न काही वाचत असतो. अध्यायनातून लक्षात आले आहे की पुस्तके वाचनाने आनंद निर्माण होतो. फ्रांसईस बेकन या महान लेखकानी लिहिले आहे की वाचन व्यक्तीला पूर्ण करते.  


पुस्तके वाचनाने आपण जगाबद्दल ज्ञान प्राप्त करू शकतो. वाचनाने नव नवीन गोष्टी शिकायला मिळतात. वाचनाचा महिमा महान लोकानी सांगितला आहे. एकदा लोकमान्य टिळकानी सांगितले की जर त्यांना वाचनासाठी पर्याप्त पुस्तके उपलब्ध झाली तर ते नरका मध्ये पण आपले जीवन काढून घेतील. पुस्तकाने ज्ञान मिळते व ज्ञानाने आत्मसम्मान  वाढतो. 


आजच्या या व्यस्त जीवन शैलीत प्रत्यकला पुस्तके वाचने संभव होत नाही. परंतु एक सुसंस्कृत व्यक्ति साठी पुस्तके नेहमीच आंनद व ज्ञानाचा स्त्रोत राहतील. वाचकांसाठी काही पुस्तके वाचन हानिकारक असू शकते. अश्या पुस्तकाना वाचण्यापासून वाचायला हवे. शुद्ध आणि पवित्र पुस्तके वाचन करायला हवीत. 


ज्याचा छंद वचन करणे असतो असा व्यक्ति कधीच एकता राहत नाही. पुस्तके आपली सर्वात चांगली मित्र असतात. ते आपल्याला ज्ञान तर देतात पण त्यासोबतच आपले मनोरंजन पण करतात. वाचन प्रेमीसाठी एकटेपणाची समस्या नसते. आनंदासाठी वाचने मजबूरी मध्ये वाचनापेक्षा चांगले असते. जेव्हा आपण मजबूरी मध्ये वाचन करतो तेव्हा त्याचा काहीही फायदा आपल्याला होत नाही. म्हणून तुम्ही काहीही वाचन करत असाल तर संपूर्ण चित्त देऊन, आंनदाने वाचा. वाचनाची आवड लहानपणापासूनच जोपासली गेली पाहिजेल. पालकांनी आपल्या मुलांना वाचनाचे महत्व समजाऊन त्याच्यात वाचनाची गोडी निर्माण करायला हवी. 

वाचनाचे महत्व निबंध | vachanache mahatva in Marathi

वाचन ही एक बहुमूल्य सवय आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यात यश व आत्मसंमान प्राप्त करायचं आहे त्यांनी पुस्तक वाचन करायला हवे. वचन व्यक्तीच्या शक्तीला योग्य दिशा प्राप्त करून देते. वाचन कल्पनाशक्ती वाढवते. व्यक्तिमध्ये धैर्य चा संचार करते. तुम्ही प्रवासवरील पुस्तके वाचून पूर्ण जगाचा प्रवास करू शकतात. 


वाचन आपल्याला भरपूर लाभ मिळवून देते, आपली रचनात्मकता वाढवते, जीवनाला सकारात्मक दिशा प्रदान करते. वाचन करणार व्यक्ति वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो. वाचन सामाजिक रूपाने चांगला नागरिक घडवते. वाचनासोबत तुम्ही विवध क्षेत्र जसे संस्कृति, कला, इतिहास इत्यादि क्षेत्राची माहिती मिळवू शकतात. वाचनामुळे तनाव दूर होतो. 


वाचनामुळे लांब प्रवासात तुम्ही आनंद मिळवू शकतात. प्रवास दरम्यान पुस्तके वाचनाने व्यक्ति बोर होत नाही व वेळ पटापट संपतो. आजच्या मोबाइल व संगणकाच्या काळात वाचनाचे प्रमाण कमी हॉट आहे. आई वाडीलाना आवश्यकता आहे की त्यांनी आपल्या मुलाना वाचनाचे महत्व समजावून वाचनाची सवय विकसित करायला हवी. वाचन बुद्धीला कुशलता प्रदान करते, प्रत्यक परिस्थिति ला सांभाळण्याची क्षमता प्रदान करते. म्हणून सोशल मीडिया व गेम खेळण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा कमीत कमी एक तास पुस्तक वाचन करायला हवे.