Advertisement

[निबंध] वेळेचे महत्व मराठी निबंध | Veleche mahatva essay in Marathi

वेळेचे महत्व मराठी निबंध (320 words)

आयुष्यात यशस्वी झालेल्या लोकांच्या यशाचे रहस्य एकच असते आणि ते म्हणजे 'वेळेचा सदुपयोग'. यशस्वी लोक वेळेचे मूल्य समजून त्याचा योग्य उपयोग करतात. जगात सर्वच गोष्टींपेक्षा वेळेला अधिक शक्तीशाली मानले गेले आहे. जर एकदा मौल्यवान वेळ गेला तर तो कधीही परत येत नाही. वेळेचे हे चक्र पुढील बाजूलाच सुरू असते. हे सत्य आहे की जर एखादा व्यक्ती वेळेचे महत्त्व समजत नाही तर वेळ देखील त्याला महत्त्व देत नाही. जर आपण आपला वेळ नष्ट करत असू तर लवकरच वेळ आपल्याला नष्ट करून टाकेल. वेळ कधीही कोणाची वाट पाहत नाही व कोणासाठी थांबतही नाही. प्रत्येकाला वेळेसोबत चालावेच लागते. 


महान संत स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते की “एका वेळी एकच काम करा, व ते काम करतांना इतर सर्व विसरून आपले पूर्ण चित्त त्यात लाऊन द्या.” ही खूपच आश्चर्याची गोष्ट आहे की एक अशी वस्तू जीचा न अंत आहे न सुरुवात, ही खूपच शक्तिशाली वस्तू आहे, जिच्या सोबत सर्वच मानव जन्म घेतात व आपले जीवन जगून नष्ट होतात. यावेळेला सीमा नसते, तो निरंतर चालत असतो. जवळपास प्रत्येकालाच वेळेचे महत्त्व माहीत असते परंतु तरीही वाईट परिस्थितीत काही लोक धैर्य हरवून आपला वेळ नष्ट करणे सुरू करतात. 


असेही म्हटले जाते की वेळ हाच धन आहे. पण जर आपले धन खर्च झाले तर ते परत मिळवले जाऊ शकते. परंतु एकदा वाया गेलेली वेळ परत मिळत नाही. म्हणूनच वेळ हा धन आणि सृष्टीतील सर्वच गोष्टींपेक्षा मौल्यवान आहे. नेहमी बदलत असलेला वेळ निसर्गाचा नियमच आहे. या निसर्गात सर्वच गोष्टी वेळेनुसार चालतात. बरेच विचार करतात की जीवन खूप मोठे आहे, परंतु सत्य तर हे आहे की हे आयुष्य खूपच लहान आहे व आयुष्यात करण्यासाठी खूपच गोष्टी आहेत. म्हणूनच वेळ वाया न दवडता आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायला हवा. 


आपले सर्व दैनंदिन कार्य जसे सकाळी उठणे, शाळेची तयारी, घराची कामे, झोपण्याचा वेळ, व्यायाम, जेवण इत्यादी गोष्टी वेळेनुसार करायला हव्यात. आपण कठीण परिश्रम करण्याचा आनंद मिळवायला हवा व कधीही चांगल्या कामांना टाळायला नको. वेळेचे महत्त्व समजून त्यानुसार आपली सर्व कार्य करायला हवीत. 

***


2) veleche mahatva short essay in marathi (220 words)

वेळ, वेळेचे चक्र असे असतो जे कधीही एका जागी स्थिर राहत नाही. वेळ सदैव गतिशिल असतो. वेळेची किंमत असणे बुद्धिमान व्यक्तीची ओळख आहे. ज्याला वेळेची किंमत असते. तो वेळेला ओळखून त्यानुसार कार्य करतो आणि यश त्याच्या चरणात असते. याशिवाय ज्याला वेळेची पारख नसते अर्थात जो व्यक्ती वेळेचे महत्त्व समजत नाही. त्याला आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते व अश्या व्यक्तीला अनेक वेळा पश्चाताप करावा लागतो. 


निसर्गातील सर्व कार्य वेळेनुसार होतात जसे सूर्य उगणे, दिवसाची रात्र होणे, ऋतू बदलने इत्यादी. जर ही सर्व कार्य वेळेवर झाली नाही तर आपल्या निसर्गाचे संतुलन बिघडून अनेक संकटे निर्माण होतील. वेळेचा सदुपयोग वेळेच्या वास्तविक ओळखीनेच संभव आहे. म्हणून आपण सर्वांनी वेळेचे महत्त्व समजून त्याचा योग्य उपयोग करायला हवा. विद्यार्थी जीवनात तर वेळेचे महत्व अधिकच आहे. ज्या व्यक्तीने विद्यार्थी जीवनात वेळेचे महत्व जाणले तो आयुष्यात खूप प्रगती करतो. वेळेचे महत्व न ओळखल्याने बरेच विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण होऊन जातात. 


वेळेचे महत्त्व समजावीत संत कबीर यांनी पुढील ओळी म्हटल्या

काल करे सो आज कर, आज करे सो अब। 

पल में प्रलय होएगी बहुरि करेगा कब।।

संत कबीरांच्या या ओळींचा अर्थ आहे की आपल्याला कोणत्याही कामांना उद्यावर टाळायला नको. उद्यावर टाळल्या जाणार या कामांना आजच करून टाकायला हवे. कबीरदासांचे मत होते की जर पुढील क्षणातच प्रलय आला तर आपले काम राहूनच जाईल. 


म्हणून शेवटी वेळेची किंमत समजून आपण त्याला महत्त्व द्यायला हवे. आपल्या आयुष्यातील वेळेवर आपण लक्ष केंद्रित करून एक क्षणही वाया घालवायला नको.

***