Advertisement

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध | dr babasaheb ambedkar nibandh in marathi

बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध | Doctor Babasaheb ambedkar nibandh in marathi

डॉ. भीमराव आंबेडकर यांनाच बाबासाहेब आंबेडकर म्हणूनही ओळखले जाते. ते स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे निर्माता, दलितांचे कैवारी आणि एक राष्ट्रीय नेता म्हणूनही ओळखले जातात. सामाजिक भेदभाव, अपमान इत्यादी अनेक यातना सोसून त्यांनी समाजात परिवर्तन घडून आण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी तयार केलेल्या राज्य घटनेत प्रत्येक नागरिकाला धर्म, जातपात इत्यादी गोष्टींपासून वर उठून स्वतंत्र देण्यात आले आहे. 


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला मध्यप्रदेश मधील इंदोर जवळ असलेल्या महू या गावात झाला. त्या काळात भारतीयांवर इंग्रजांचे शासन होते. आंबेडकरांचे जन्म नाव भीम सकपाळ होते. त्यांचे वडील रामजी मालोजी सपकाळ भारतीय सैन्यात सुभेदार होते. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई होते. जेव्हा आंबेडकर 6 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. 


आपल्या सर्व भावंडांमध्ये आंबेडकर यांनीच उच्च शिक्षण प्राप्त केले. त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मुंबई विश्वविद्यालयातून ग्रॅज्युएशन केले याच कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीती विज्ञान मध्ये डिग्री प्राप्त केली. आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड यांच्या द्वारा स्थापित योजने अंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात आली आणि अर्थशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी ते न्यूयॉर्क मध्ये असलेल्या कोलंबिया विश्वविद्यालयात गेले.  जून 1915 मध्ये अर्थशास्त्रासोबत त्यांनी इतिहास, समाजशास्त्र, दर्शन आणि राजनीती सारख्या विषयातही डिग्री मिळवली. 


भारतात परत आल्यावर त्यांनी लोकांना जागृत व संघटित करून जतिगत भेदभावा विरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले. आपल्या या कार्यात त्यांना बऱ्याचदा समाजाकडून विरोध सहन करावा लागला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी दलित समाजाच्या लोकांना आरक्षणाची मागणी केली. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीच्या हरिजन आंदोलनात सहभागी झाले. ज्यात त्यांनी भारतातील मागासवर्गीय लोकांद्वारे सहन केल्या जाणाऱ्या सामाजिक अन्यायाच्या विरोधात आपले योगदान दिले. आंबेडकरांनी देशातून अस्पृश्यता मिटवण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले. 


भारताच्या स्वातंत्र्यानंतर 29 ऑगस्ट 1947 ला त्यांना  भारतीय राज्य घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. देशाच्या संविधान निर्माण कार्यात त्यांचा प्रमुख उद्देश जातिगत भेदभाव दूर करून सर्वांना समान अधिकार देणे हा होता. भीमराव आंबेडकरांनी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या मध्ये दलितांना विशेष आरक्षण दिले. जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 7 दिवसांच्या कठीण परिश्रमानंतर देशाचे संविधान तयार करण्यात आले. व 26 जानेवारी 1950 ला हे संविधान लागू करण्यात आले. 


1954 व 1955 साली डॉ आंबेडकरांचे आरोग्य हळू हळू बिघडायला लागले. आपल्या मृत्यूच्या 2 महिन्या आधी त्यांनी हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात प्रवेश केला. या घटनेच्या दोन महिन्यांनंतर 6 डिसेंबर 1956 ला दिल्ली मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

--समाप्त--