OMTEX AD 2

माझी शाळा निबंध मराठी | Majhi Shala Nibandh (400 शब्द)

माझी शाळा निबंध मराठी | Majhi Shala Nibandh (400 शब्द)

माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा माध्यमिक विद्यालय आहे. माझी शाळा  साताऱ्यात आहे, शाळेच्या खूप साऱ्या शाखा आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी माझ्या शाळेची वेगळीच ओळख आहे. माझ्या या शाळेचे बांधकाम अशा पद्धतीने केले आहे की बघताना अतिशय सुंदर व मनमोहक वाटते. 


शाळेचे वातावरण इतके शांत आणि सकारात्मक आहे की मला कायम जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असते. माझ्या घरापासून शाळा 2 किलो मीटर च्या अंतरावर आहे, म्हणून मी दररोज शाळेच्या बस मध्ये बसून शाळेत जातो. शहरातील प्रत्येक ठिकाणी मुलांना न्यायला स्कूल बस पाठवली जाते. माझी शाळा शहरापासून थोड्या दूर आहे. शाळेची ही जागा प्रदूषण मुक्त व अतिशय शांत आहे. 


कस्तुरबा शाळेची इमारत 3 मजली आहे, ज्यात तीनही मजल्यांवर मोठ मोठे वर्ग आहेत आणि प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांच्या सुविधेचा विचार करून व्यवस्थित काम करण्यात आले आहे. शाळेचे फक्त वर्गचं नाही तर प्रार्थना रूम आणि सभागृह सुद्धा भव्य आहेत. याशिवाय शाळेच्या आवारात लावण्यात आलेले झाडे शाळेच्या सुंदर्तेत आणखी भर करीत असतात. 


अभ्यासाशिवाय खेळण्यासाठी सुद्धा खूप चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेचे मोठेच पटांगण आहे जेथे आम्ही क्रिकेट, फुटबॉल, कब्बडी, खोखो, रनिंग असे खेळ खेळतो. माझ्या शाळेत एक मोठे ग्रंथालय आहे या ग्रंथालयात शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त वेगवेगळी कथा आणि कादंबरीची पुस्तके उपलब्ध आहेत. शाळेच्या ग्राउंड फ्लोउर वर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठे ऑडिटोरियम म्हणजेच सभागृह आहे. 


माझ्या शाळेत जवळपास 2 प्राचार्य, 60 शिक्षक आहेत, झाडांच्या साफ सफाई साठी एक माळी, शाळेच्या स्वच्छतेसाठी 3 कर्मचारी, दोन वॉचमन आणि ऑफिस कामासाठी क्लर्क सोबत इतर स्टाफ पण आहे. शिक्षणाची गुणवत्ता पाहता माझी शाळा मागील बऱ्याच वर्षांपासून शहरात पाहिल्या स्थानावर आहे. कारण या शाळेतून निघालेले जवळपास 90% विद्यार्थी मोठ मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. 


माझ्या शाळेच्या यशाचे पूर्ण श्रेय येथील शिक्षकांना जाते. आमचे शिक्षक अतिशय मन लाऊन सोप्या पद्धतीने सर्व विषय समजावून सांगतात. आमच्या शाळेत शालेय अभ्यासा एवजी इतर कौशल्य विकासावरही भर दिला जातो. आमचे शिक्षक पुस्तकी ज्ञाना सोबतच प्रात्यक्षिक शिक्षणावर पण भर देतात. 


आमच्या शाळेत सर्व सण उत्सव साजरे केले जातात. महत्वाचे दिवस व महान नेत्यांच्या जयंती आणि पुण्यतिथि ला भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातात. या शिवाय शाळेत आम्हाला पोहणे, गाणे, स्केटिंग इत्यादि गोष्टी शिकवले जातात.


इत्यादी अनेक कारणांमुळे मी कस्तुरबा शाळेपासून अतिशय संतुष्ट आहे. येथील सर्व शिक्षक सदैव मदतीला तयार असतात. आणि या सोबतच माझ्या शाळेचे वातावरण सुद्धा अतिशय निसर्गरम्य आहे. म्हणूनच मला माझी शाळा खूप आवडते.