Advertisement

माझी शाळा निबंध मराठी | Majhi Shala Nibandh Marathi (300 शब्द)

माझी शाळा निबंध मराठी | Majhi Shala Nibandh Marathi (300 शब्द)

माझ्या शाळेचे नाव प्रताप विद्यामंदिर आहे. माझी शाळा एक आदर्श विद्यालय आहे. येथे शिक्षण, खेळ व इतर शैक्षणिक सुविधा उत्तम तऱ्हेने उपलब्ध आहेत. येथील वातावरण देखील शांत व निसर्ग रम्य आहे. शिक्षणाच्या बाबतीत माझी शाळा शहरातील उत्कृष्ट शाळांपैकी एक आहे. 


माझ्या शाळेत इयत्ता 6 वी पासून 10 वी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. शाळेची 2 मजली भव्य इमारत आहे. यात जवळपास 50 खोल्या आहेत. प्रत्येक वर्गात कॅमेरा, फर्निचर, पंखे इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. या शिवाय प्रार्थना हॉल, स्टाफ रूम, सभागृह, ग्रंथालय, कॉम्प्युटर लॅब, प्रयोग शाळा ई. वेगवेगळे वर्ग आहेत. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी फिल्टर व थंड पाणी उपलब्ध आहे. स्वच्छ शौचालयाची सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात वेगवेगळी झाडे लावण्यात आली आहेत. माळी काका या वृक्षांची खूप काळजी घेतात.


माझ्या शाळेत जवळपास दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षकांची संख्या 30 आहे, याशिवाय झाडांच्या साफ सफाई साठी एक माळी, शाळेच्या स्वछतेसाठी 3 कर्मचारी, दोन वॉचमन आणि ऑफिस कामासाठी क्लर्क सोबत इतर स्टाफ पण आहे. आमचे सर्वच शिक्षक शिस्त प्रिय आहेत. शिक्षकांच्या नेतृत्व मुळे माझी शाळा दिवसेंदिवस प्रगती करीत आहे.  


आमच्या इयत्ता 7 वीच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 60 आहे. माझ्या वर्गात माझे खूप चांगले मित्र आहेत. आम्ही सर्वजण सोबत खेळतो तसेच अभ्यास करतो. आमच्या वर्गात बसण्यासाठी बाकांची खूप छान व्यवस्था करण्यात आली आहे. जास्त दाटीवाटी न करता मोकळे बसण्यासाठी मोठे बाक लावण्यात आले आहेत. दररोज एक शिपाई काका या बाकांची धूल पुसून स्वच्छ करतात. 


माझ्या शाळेत अभ्यासाशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी सुद्धा दिली जाते. विद्यार्थी व विद्यार्थिनी बाल दिवस, स्वतंत्र दिवस, प्रजासत्ताक दिन, लोकमान्य टिळक पु्यतिथी, महात्मा गांधी जयंती अश्या विविध दिवशी भाषणे देखील देतात. या शिवाय शाळेत विवध विषयांवर वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामुळे आमच्यात प्रमाणिकता, सहयोग, आनंद, शिस्त, नेतृत्व ई. गोष्टींचा विकास होतो. 


माझ्या शाळेत सर्व काही व्यवस्थित व शिस्तपूर्ण आहे. शिक्षणाच्या बाबतीत माझी शाळा  नंबर एक आहे. मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे आणि मला माझी शाळा खूप खूप आवडते.