Advertisement

पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध | Purgrastache Manogat Marathi Nibandh

पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध | Purgrastache Manogat Marathi Nibandh

मी एक पूरग्रस्त पीडित व्यक्ती आहे. खरोखर त्या रात्री मी आयुष्यातील सर्वात जास्त भीतीदायक वेळ पहिला होता. त्या दिवशी दिवसभर पाऊस सुरू होता मला वाटेल की हा नेहमी प्रमाणे सामान्य पाऊस आहे. माझे घर कच्चे असल्याने माझ्या भिंतीतून नेहमी प्रमाणे पाणी गळत होते. परंतु मी या कडे काही जास्त लक्ष दिले नाही. कारण दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात घर गळायचे, या वर्षी पाऊस थोडा जास्त होता परंतु मी त्याकडे काही खास लक्ष दिले नाही. रात्री 8-9 च्या सुमारास मी माझी पत्नी मुले आणि आई वडील जेवण करून झोपलो.


अचानक रात्रीच्या 2 वाजेच्या सुमारास जोरदार आवाजाने माझे डोळे उघडले. आवाजाने घाबरून मी बाहेर पडलो दरवाजा उघडून पाहिले तर आमच्या समोरच्याचे घर अती पावसामुळे कोसळले होते. मी खूप घाबरलो. बाहेर पाणी गुडग्याच्या वर होते. मी लवकरात लवकर घरातील सर्व सदस्यांना बाहेर काढले व आम्ही घराजवळ असलेल्या एका उंच ठिकाणी जाऊन उभे राहिलो. माझ्या कुटुंबालाही माझ्या सोबत सुरक्षित वाटत होते. 


मला वाटत होते की काही वेळात पावसाचे पाणी कमी होईल. परंतु माझा अनुमान पूर्णतः चुकीचा होता. पाणी आधीपेक्षा जास्त जोरात येऊ लागले. हवाही खूप जोरात सुरू होती. आमच्या आजूबाजूचे काही घर पडून ते लोक त्याखाली दाबले गेले होते. आम्ही कसे तरी घरा बाहेर पडालो होतो. आता पावसाचे पाणी आणखीन वाढत होते, आमचे घर अर्ध्याच्या वर पावसात बुडाले होते. आणि पुन्हा एकदा जोरदार आवाज झाला व आमचे घर जमीनदोस्त झाले. घरातील सर्व सामान दाबले गेले होते. 


आमच्या समोर घरातील वस्तू वाहू लागल्या परंतु आम्ही काहीही करू शकत नव्हतो. या महापुरात शहरातील 200 पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. मी स्वताला व माझी कुटुंबाला भाग्यशाली समजत होतो. या प्रचंड महापुरातून आम्ही सुखरुप बाहेर पडलो होतो. परंतु आमचे सर्व धन व किमती वस्तू नष्ट झाल्या होत्या. आमच्या काही नातेवाईकांनी काही काळ आम्हाला राहायला स्थान दिले. थोडी पैश्यांची मदतही केली. शासनानेही महापूरग्रस्त लोकांना काही पैसे दिले. ज्यामुळे आम्हाला पुन्हा संसार थाटण्यासाठी मदत झाली. 


या अनुभवानंतर आमच्या लक्षात आले की महापूर ग्रस्त लोकांची स्थिती कशी असते. आपल्या देशात दरवर्षी कुठे न कुठे महापुराने लोकांची घरे दरे नष्ट होतात. अश्या वेळी आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की आपण त्यांची शक्य होईल तेवढी मदत करावी. पूरग्रस्त या लोकांची सेवा केल्याने भरपूर पुण्याची प्राप्ती होते.

या निबंधाचे शीर्षक पुढील प्रमाणे असू शकते. 

  • पूरग्रस्ताची आत्मकथा 

  • पूरग्रस्ताचे आत्मवृत्त 

  • पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध 

  • Purgrastache Manogat 

  • purgrastachi atmakatha


.