Advertisement

सूर्याची आत्मकथा मराठी निबंध | Suryachi Atmakatha in Marathi

सूर्याची आत्मकथा मराठी निबंध | Suryachi Atmakatha in Marathi

हजारो वर्षांपासून न चुकता दररोज तुमच्या समोर येऊन तुम्हाला प्रकाश देणारा मी सुरू बोलतोय. मी संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. मी आकाशगंगेत एकमेव नैसर्गिक प्रकाश, ऊर्जा आणि उष्णतेचा स्त्रोत आहे. ज्या पद्धतीने मी पृथ्वीसाठी उपयुक्त आहे. त्याच पद्धतीने आकाशगंगेत असलेल्या सर्व ग्रहांच्या अस्तित्वासाठी मी महत्वाचा आहे.


माझी निर्मिती जवळ पास 4.6 अरब वर्षांपूर्वी अतीतप्त वायूमुळे झाली होती. माझ्यामध्ये 74 टक्के हायड्रोजन, 24 टक्के हेलियम आणि 2 टक्के अंतर्भूत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असल्याने माझ्यावर नेहमी ज्वालामुखी व आगीचा उद्रेक होत असतो. माझ्यावर ऑक्सिजन नाही आहे. आणि माझ्यावर तयार होत असलेल्या ऊर्जेचा 5 अब्जावा भागच पृथ्वीवर पोहचतो. मला अणुभट्टी ही म्हटले जाते. आज माझ्या ऊर्जेचा वापर जवळपास 8 ग्रह करीत आहेत. या ग्रहांची नावे क्रमशः पुढील प्रमाणे आहेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून इत्यादी. या शिवाय इतरही लहान ग्रह व धेमकेतू माझ्या प्रकाशात येतात. 


धार्मिक दृष्टीने पहिले तर माझ्या बद्दल अनेक गोष्टी प्रचलित आहेत. काही लोक मला परमेश्वराप्रमाणे पूजतात, मला दररोज जल अर्पित करून धन्यवाद देतात. प्राचीन काळापासून माझी पूजा केली जात आहे. हिंदू धर्मात मला सूर्यदेव म्हटले जाते. माझ्याविषयी अनेक धार्मिक कथा प्रचलित आहेत. 


विज्ञानिक दृष्टीने पाहिले तर मी पृथ्वी साठी अतिशय महत्त्वाचा आहे. आज पृथ्वीवर माझ्या ऊर्जेचे अनेक उपयोग करून घेतले जात आहेत. माझ्या प्रकाशापासून वीज तयार केली जाते. डॉक्टर हाडांचे त्रास असणाऱ्या लोकांना माझ्या कोवळ्या प्रकाशात बसण्याची सल्ला देतात. 


खरोखर मी पृथ्वी साठी खूप महत्त्वाचा आहे. परंतु आज पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. परिणामी पृथ्वीच्या सभवताली असणाऱ्या ओझोन लेयरला क्षति पोहचत आहे. ओझोन वायू या माझ्या अती उष्ण किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतो. ज्यामुळे तुमचे रक्षण होते. परंत आज वाढत्या वायू प्रदूषण मुळे ओझोन वायू नष्ट होत आहे. परिणामी माझी तीव्र किरणे पृथ्वीच्या क्षेत्रात पोहचत आहेत. ज्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढून ग्लोबल वॉर्मिग चे प्रमाणही वाढत आहे. म्हणून पृथ्वी साठी माझे जसे फायदे आहेत तसेच नुकसानही आहेत. माझा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्हाला प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल.


या निबंधाचे शीर्षक पुढील प्रमाणेही असू शकते 

सूर्याची आत्मकथा 

सूर्याचे आत्मवृत्त 

सूर्याचे मनोगत 

मी सूर्य बोलतोय