Advertisement

माझा आवडता सण ईद मराठी निबंध | Maza Avadta San eid Nibandh Marathi.

ईद हा सण आपल्या देशात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणामध्ये एक प्रमुख सण आहे. ईद मुस्लिमांद्वारे पूर्ण भारतात भव्यपणे साजरी केली जाते. ईद फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर जेथे जेथे मुस्लिमधर्मीय लोक राहतात तेथे भव्यपणे साजरी केली जाते. आजच्या या आर्टिकल मध्ये तुम्हाला ईद ची माहिती, ईद निबंध मराठी, ईद सणाची माहिती, ईद विषयी माहिती, Eid in Marathi essay, maza avadta san Eid इत्यादी माहिती मिळणार आहे.


माझा आवडता सण ईद मराठी निबंध-

आपल्या देशात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. पण ईद हा मुस्लिम धर्माचा प्रमुख सण आहे. प्रत्येक वर्षात दोन ईद येतात एक ईद उल फितर आणि दुसरी ईद उल जुहा. यात ईद उल फितर ज्याला रमजान ईद पण म्हटले जाते, हा मुस्लिमांचा प्रमुख सण आहे. मला सुद्धा रमजान ईद खूप आवडते. रमजान चा महिना खूपच पवित्र असतो. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम लोक रोजा म्हणजेच उपवास ठेवतात आणि महिन्याच्या शेवटी उपवास सोडून रमजान ईद साजरी केली जाते. रमाजन चा महिना मुस्लिम कॅलेंडर चा नववा महिना असतो. रमजान ईद ला नमाज पाठ करून प्रार्थना केली जाते या नंतर भोजन करून रोजे सोडले जातात व सर्व मुस्लिम बांधव एकमेकाशी भेटून आनंद साजरा करतात. 


रमजान ईद भारतासह जिथे जिथे मुस्लिम लोक आहेत त्या सर्व देशांमध्ये साजरी केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ केली जाते. नवे कपडे घालून सुगंधित अत्तर लावले जाते. जास्त करून मुस्लिम पुरुष या दिवशी पांढरे कपडे घालतात. पांढरा रंग हा पवित्रता आणि साधेपणाचे प्रतीक आहे. या नंतर मोठ्या संख्येत मुस्लिम अनुयायी सकाळी मशिदी मध्ये प्रार्थनेला पोहोचतात. 


नमाज पूर्ण झाल्यावर सर्व मुस्लीम कुराण मध्ये सांगितल्याप्रमाणे गरिबांना अन्न दान करतात. या दिवशी मुस्लिम मशिदी मध्ये लायटिंग लाऊन सजवतात. हा दिवस खूपच आनंदाचा दिवस असतो. ईद सर्वांना मिळून राहण्याचा संदेश देते. ईद ची ही शिकवण सर्वांनी आत्मसात करायला हवी. मी कुराण मध्ये सांगितल्याप्रमाणे जास्तीजास्त चांगली कामे करील. मला ईद खूप आवडते आणि माझा आवडता सण ईद आहे.